Neet Exam : वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये पूर्ण ; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची माहिती

‘‘देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होईल,’’ अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
Neet Exam
Neet Exam sakal
Updated on

अर्थसंकल्पी अधिवेशन

नवी दिल्ली : ‘‘देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होईल,’’ अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार व पेपरफुटीबद्दल मूळ प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री पटेल म्हणाल्या, ‘‘वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ची परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी ‘एनटीए’ची स्थापना करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना एकच परीक्षा देऊन महाविद्यालयांतील प्रवेश खुले ठेवण्याचा पर्याय या परीक्षेतून मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आता ‘नीट’च्या परीक्षांच्या निकालाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाचा पहिला टप्पा १४ ऑगस्टला पूर्ण होणार आहे. दुसरा टप्पा १५ सप्टेंबर, तिसरा २६ सप्टेंबर व समुपदेशनाचा अखेरचा टप्पा येत्या १६ ऑक्टोबरला पूर्ण होणार असल्याचे राज्यमंत्री पटेल यांनी सांगितले. ‘नीट’ परीक्षेच्या विकेंद्रीकरणाची ‘सीपीआय’चे ए. ए. रहिम यांची मागणी मात्र आरोग्य राज्यमंत्री पटेल यांनी फेटाळून लावली.

विदेशात शाखा वाढल्या

भारतीय बँकांची विदेशातील शाखांमध्ये वाढ झाल्याची माहिती अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली. या संदर्भात डॉ. अनिल बोंडे यांनी प्रश्न विचारला होता. विदेशात भारतीय बँकांच्या शाखांची संख्या २०१४ मध्ये ५६० एवढी होती. ती आता ६४४ झाली आहे. यामध्ये सार्वजनिक उपक्रमातील बँकांची संख्या किती? असे विचारले असता या बँकांची संख्या १९६ वरून ६७ वर आल्याची कबुली राज्यमंत्री चौधरी यांनी दिली.

एचआयव्हीबाधित महिलांवर मोफत उपचार

एचआयव्हीबाधित गर्भवतींवर मोफत उपचार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली. यासंदर्भात झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ मांझी यांनी प्रश्न विचारला होता. एचआयव्ही बाधित महिलांची अपत्ये एचआयव्ही संक्रमित होण्याची शक्यता असते. प्रत्येक गर्भवतींची एचआयव्ही चाचणी केली जाते. या चाचणीत गरोदर महिला एचआयव्ही संक्रमित आढळून आल्यानंतर त्यानंतरचा सर्व उपचार सरकार दवाखान्यांमध्ये मोफत केला जातो. एचआयव्ही संक्रमित महिलांची अपत्ये संक्रमित होण्याचे प्रमाण आता केवळ तीन टक्के राहिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.