राज्यसभेतील महागोंधळाची चौकशी

उच्चाधिकार समितीची लवकरच स्थापना; वचक राहण्यासाठी कारवाई
rajya sabha
rajya sabha Sakal
Updated on

नवी दिल्ली : राज्यसभेत ११ ऑगस्टला झालेल्या महागोंधळाची चौकशी करण्यासाठी विशेष उच्चाधिकार समिती लवकरच स्थापन होणार असून याबाबत विरोधक न्यायालयात गेल्यास काय उपाय असतील, याबाबत माजी महासचिव आणि कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे. राज्यसभा सचिवालयाने त्या दिवशीच्या गदारोळाचा ‘मिनीट टू मिनीट’ अहवाल सीसीटीव्ही फुटेजसह राज्यसभाध्यक्षांना सादर केला आहे.

rajya sabha
चला, एकजूट होऊया! सोनिया गांधींनी बोलावली समविचारी विरोधकांची बैठक

या गोंधळाबाबत राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू व लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी काल (ता. १२) चर्चा केली. सभागृहाची प्रतिष्ठा मातीमोल करणारा गोंधळ करणाऱ्या संबंधित सदस्यांना जरब बसेल अशी कारवाई केलीच पाहिजे, यावर उभयतांचे एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या गोंधळाची चौकशी करणाऱ्या समितीची स्थापना करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी आणि दोन्ही महासचिव सध्या कायदेतज्ज्ञांची आणि माजी महासचिवांची मते घेत आहेत. जास्तीत जास्त आठवडाभरात या समितीची घोषणा होईल, असे सांगितले जाते. या समितीमध्ये सहा ते १२ सदस्य असतील.

rajya sabha
‘सिंगल युज प्लॅस्टिक’वर सरकारची फुली; पुढील वर्षी जुलैपासून अंमलबजावणी

राज्यसभेतील गोंधळात काँग्रेसच्या महिला खासदारांनी केलेल्या झटापटीत अर्पिता भट या मार्शल गंभीर जखमी झाल्या आहेत. भट यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतरही काही मार्शल जखमी झाले आहेत. या अहवालात ११ तारखेला सायंकाळी ६.०२ ते ७.०५ या काळातील घटनांचा प्रत्येक मिनीटांचा तपशील आणि सीसीटीव्ही फुटेजही जोडण्यात आले आहे. सभागृहात बाहेरून सुरक्षा रक्षक आणल्याचा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप अहवालात स्पष्टपणे फेटाळण्यात आला आहे. संसद दूरचित्रवाणीच्या धर्तीवर सरकारने जी नवीन संसदीय सुरक्षा संस्था (जुने नाव- लोकसभेचा वॉच अॅंड वॉर्ड) तयार केली आहे, त्याच संस्थेचे हे सुरक्षा रक्षक होते. त्यांना रीतसर बोलावून घेण्यात आले होते, असेही सचिवालयाने म्हटले आहे.

rajya sabha
रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश

अहवालातील काही ठळक घटना

सभागृहाचे कामकाज स्थगित होण्यापूर्वी शिवसेनेचे अनिल देसाई आणि इतरांनी सभापतींच्या समोरील अधिकाऱ्यांसमोरचे कागद फाडून हवेत भिरकावले.

सायंकाळी ६.०२ वा. : तृणमूलच्या डोला सेन यांनी ओढणीचा वापर करून फाशीचा दोर तयार केला.

६.०४ वा. : तो दोर त्यांनी शांता छेत्री यांच्या गळ्यात घातला आणि दोघी सभापतींच्या आसनाजवळ जाऊन घोषणाबाजी करू लागल्या.

६.०६ वा. : फुलो देवी आणि छाया वर्मा यांनी टेबलाच्या दिशेने कागद फेकले.

६.१७ वा : अखिलेश प्रसाद सिंह यांनी गोंधळाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केले.

६.२२ वा. : संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी आणि सभागृह नेते पीयूष गोयल यांना डोला सेन यांनी धक्का देऊन खाली पाडण्याचा प्रयत्न केला. याच झटापटीत मार्शल अर्पिता भट यांना गंभीर दुखापत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()