नवी दिल्ली: इंडियन एअर फोर्सच्या C-17 ग्लोबमास्टर (C-17 Globemaster) या विशेष विमानाने काल भारतीय दूतावासात काम करणारे राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी (Indian Embassy Staff) भारतामध्ये दाखल झाले. अफगाणिस्तान (Afganistan) पुन्हा एकदा तालिबानच्या (Taliban) ताब्यात गेल्यानंतर या दूतावासातील कर्मचाऱ्यांसाठी भारतात दाखल होईपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अफगाणिस्तानातून भारतात परतताना या कर्मचाऱ्यांना कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागला? काय अडथळे आले? त्याची इनसाइड स्टोरी समोर आली आहे.
जवळपास ३६ तास मिशनच्या कम्पाऊंड परिसरामध्ये काढल्यानंतर मंगळवारी सकाळी तालिबानी बंडखोरच त्यांना विमानतळापर्यंत घेऊन आले. पण भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित जाऊ देण्यासाठी परदेशी संस्थांनी हस्तक्षेप केल्यानंतरच हे शक्य झालं. "सुरुवातीला सर्वांना एकत्र बाहेर काढण्याची योजना होती. सोमवारी १६ ऑगस्टला ४५ भारतीय विमानतळापर्यंत पोहोचले. तालिबानने भारतीय असलेल्या अन्य दोन ताफ्यांना माघारी फिरण्यास सांगितले" सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला ही माहिती दिली.
"दुसऱ्या ताफ्यामध्ये राजनैतिक अधिकाऱ्यांसह एकूण ८० भारतीय होते. त्यांना माघारी फिरण्यास सांगण्यात आले. फक्त भारतीयांच्या हालचालींवर बंदी होती. दुसऱ्या देशांच्या नागरिकांच्या संचारावर कुठलेही निर्बंध नव्हते" असे या अधिकाऱ्याने सांगितले. भारत सरकार पडद्यामागे अनेक देशांच्या संस्थांबरोबर चर्चा करत आहे. यात रशिया सुद्धा आहे. भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना एअरपोर्टपर्यंत जाऊ देण्यासाठी अखेर त्यांनी तालिबानला राजी केले.
"तालिबानचे बंडखोर विमानतळापर्यंत आमच्यासोबत होते. अमेरिकन एजन्सीच्या मदतीने तिथपर्यंत पोहोचल्यानंतर अखेर आमच्या विमानाने भारतासाठी उड्डाण केलं" असं या अधिकाऱ्याने सांगितलं. काबूल विमानतळाचे संचालन सध्या अमेरिकेकडे आहे. एटीसीचे काम त्यांच्या देखरेखीखाली सुरु आहे. ४५ भारतीय असलेल्या पहिल्या सी-१७ विमानाने सोमवारी रात्री दिल्लीत लँडिंग केले. दुसऱ्या विमानाने मंगळवारी दुपारी हिंडन एअरफोर्स बेसवर लँडिंग केले. यामध्ये दूतावासातील कर्मचारी आणि इंडो-तिबेटीयन पोलीस आहेत. रविवारी तालिबानने काबुलवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर सोमवारी काबूल विमानतळावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. देश सोडण्यासाठी हजारो अफगाणि नागरिक विमातळावर पोहोचले होते. त्यावेळी झालेला गोळीबार आणि चेंगराचेंगरील काही जणांचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.