एस. धनुजाकुमारी
तिरुअनंतपुरम : कचरा उचलणाऱ्यांचे आयुष्य खडतर असते. बालपणापासून ते कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना अनेक संघर्षातून जावे लागते. घरोघरी जावून कचरा गोळा करताना आलेले अनुभव आणि मानापमान कागदावर उतरविण्याचे सामर्थ्य सर्वांतच असते असे नाही. परंतु चेंगलचुलासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि हरित कर्मा सेनेसाठी काम करणाऱ्या एस. धनुजाकुमारी यांनी लिहिलेली संघर्षगाथा प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे कन्नूरच्या विद्यापीठात बीएच्या विद्यार्थ्यांसाठी आणि कालिकतच्या विद्यापीठात एमएच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अभ्यासक्रमाचा भाग बनले आहे.