केजरीवालांबद्दल अपमानास्पद वक्तव्य; आपचे आमदार म्हणाले...

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Arvind Kejriwal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल दिल्ली भाजप (BJP) अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्याविरोधात सोमवारी (ता. २८) विधानसभेत निषेध प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यादरम्यान आप आमदार म्हणाले की, अशी टिप्पणी शिरच्छेदास पात्र आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल यांनी भाजपचे तीन आमदार अनिल बाजपेयी, जितेंद्र महाजन आणि अजय महावर यांना काही काळासाठी निलंबित केले. तिन्ही आमदार आपापल्या जागेवर उभे राहिले. त्यानंतर सभापतींनी त्यांना बसण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी न ऐकल्याने सभापतींनी सभागृह सोडण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी, सकाळीही कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

Arvind Kejriwal
नील, किरीट सोमय्या आणि नीलेश राणेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच आम आदमी पक्षाचे आमदार आसनाजवळ आले आणि भाजप (BJP) नेत्याने केजरीवाल यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात घोषणाबाजी करू लागले. गुप्ता यांनी माफी मागावी, अशी मागणी आपचे आमदार मोहिंदर गोयल यांनी केली. गुप्ता यांच्यावर निषेधाचा प्रस्ताव आणण्याची मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल सभागृहात निषेधाचा प्रस्ताव आणला जावा, असे दिल्ली युनिटचे अध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले. जेव्हा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा गोयल यांनी मांडलेला निषेधाचा प्रस्ताव सभापतींनी स्वीकारला आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. ‘आम्ही चांगले लोक आहोत, आमचे कार्यकर्ते शरीफ आहेत. अन्यथा, अशी टिप्पणी शिरच्छेदास पात्र आहे’, असे गोयल म्हणाले. त्यांनी गुप्ता यांना भाजपशासित राज्यांच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याविरुद्ध अशी टीका करण्याचे आव्हान दिले.

Arvind Kejriwal
UP : उपमुख्यमंत्र्यांचा मुलाचा अपघात; कारने ट्रॅक्टरला दिली धडक

... तर मी हात जोडून माफी मागेन

कोणी आक्षेपार्ह शब्द वापरला असेल तर मी त्याचा निषेध करतो. आदेश गुप्ता यांच्यावरील आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर मी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची (Arvind Kejriwal) हात जोडून माफी मागेन, असे सभागृहातील विरोधी पक्षनेते रामवीर बिधुरी म्हणाले. नंतर सभापतींनी बिधुरी यांना या टिप्पणीचा व्हिडिओ दाखवण्यास सांगितले. नंतर निलंबित भाजप (BJP) आमदारांना सभागृहाच्या कामकाजात पुन्हा सामील होण्याची परवानगी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.