देशाचे 11 वे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे त्यांचा जन्म झाला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे उत्कृष्ट आणि नामवंत शास्त्रज्ञ तसेच ते देशाचे राष्ट्रपती राहिले. भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
27 जुलै 2015 रोजी कलाम IIM च्या एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी शिलाँग येथे आले होते. या कार्यक्रमा दरम्यान त्यांचे भाषण सुरू असताना त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.
असं म्हणतात डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे त्यांचे आयुष्य अत्यंत साधेपणात जगले. त्यांच्या आयुष्यातील असे अनेक किस्से आहे जे त्यांच्या साधेपणाची, माणुसकीची तसेच प्रामाणिकपणाची उदाहरणे देतात. चला तर जाणून घेऊया काही किस्स्यांबाबत.
साडेतीन लाख रुपयांचा चेक भरुन राष्ट्रपती भवनाचे भाडे भरले
राष्ट्रपती भवनाशी संबंधित एक किस्सा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या साधेपणाचे आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण देतो. देशाचे 11 वे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी 2006 मध्ये त्यांच्या कुटुंबाला राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले होते. 52 लोक दिल्लीत आले आणि 8 दिवस राष्ट्रपती भवनात राहिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वत: च्या खिशातून कुटुंबाच्या राहण्याचा आणि त्यांच्या जेवणाचा खर्च भरला.
एवढेच नाही तर त्यांचे कुटुंब त्यानंतर दिल्लीनंतर अजमेर शहराकडे गेले. याचा एकूण खर्च साडे तीन लाख रुपये होता, जो कलाम यांनी चेकद्वारे राष्ट्रपती भवन कार्यालयात पाठविला.
राष्ट्रपती भवनातील इफ्तार पार्टीचे पैसे अनाथाश्रमात दान करण्यात आले
कलाम यांचे सचिव असलेले पीएम नायर यांनी हा किस्सा सांगितलाय. राष्ट्रपती भवनात दरवर्षी इफ्तार पार्टी आयोजित करण्याचा ट्रेंड आहे. एकदा कलाम यांनी नायर यांना बोलावले आणि म्हणाले, 'इफ्तार पार्टी का आयोजित केली जाते? यावर किती खर्च होतो? ' यासाठी अडीच लाख रुपये खर्च असल्याते त्यांना सांगण्यात आले. त्यावर ते म्हणाले, 'हे पैसे वाया जाऊ नयेत. हे पैसे अनाथाश्रमाला द्या.'
इफ्तार पार्टीच्या रकमेतून 28 अनाथाश्रमातील मुलांना पीठ, डाळ, ब्लँकेट, स्वेटरचे वाटप करण्यात आले. यासोबतच त्यांनी स्वत:च्या खिशातून एक लाख रुपये दिले होते, असेही नायर हा किस्सा सांगताना म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.