Interim budget 2024: "जुलैमध्ये पुन्हा बजेट सादर करु" सीतारमन यांच्या विधानावर हरसिमरत कौर बादल बरसल्या; म्हणाल्या, अहंकार...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आजच बजेट सादर केलं आहे.
Interim budget 2024: "जुलैमध्ये पुन्हा बजेट सादर करु" सीतारमन यांच्या विधानावर हरसिमरत कौर बादल बरसल्या; म्हणाल्या, अहंकार...
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आजच अंतरिम बजेट सादर केलं. पण हे बजेट सादर करताना आम्ही पुन्हा जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करु, असं म्हटलं. त्यामुळं खरंतर निवडणूक होण्याआधीच ती जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केल्यानं त्यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. (Interim budget 2024 Harsimrat Kaur Badal lashes out at Sitharaman who said will present budget again in July)

काय म्हणाल्या सीतारमन?

सीतारमन म्हणाल्या, "आजच बजेट हे अंतरिम आहे पण जुलै महिन्यातील पूर्ण बजेटमध्ये आमचं सरकार विकसित भारताच्या आमच्या धोरणाचा विस्तृत आराखडा सादर करेल" सीतारमन यांच्या या विधानावरुन आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पण आता त्यांच्या या विधानावरुनच विरोधकांनी टीकाबाजी सुरु केली आहे. (Latest Marathi News)

Interim budget 2024: "जुलैमध्ये पुन्हा बजेट सादर करु" सीतारमन यांच्या विधानावर हरसिमरत कौर बादल बरसल्या; म्हणाल्या, अहंकार...
Bharat Jodo Yatra Spending: राहुल गांधींच्या 'भारत जोडो'ला तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च; पक्षाच्या वार्षिक खर्चाच्या १५ टक्के रक्कम

हरसिमरत कौर बरसल्या

सीतारमन यांच्या विधानावर भाष्य करताना शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी म्हटलं की, "मला या बजेटमध्ये एक अहंकार दिसून येत होता. आम्ही जुलैमध्ये बजट सादर करु असं त्यांनी म्हटलं, त्यावरुन तुम्ही कोणतीही निवडणूक हलक्यात घेणार नाही, असंच त्यांनी सांगितलंय. आज तुमच्याजवळ संधी होती पण गेल्या १० वर्षात केलेले वायदे पूर्ण करावेत, केवळ जनतेला आणखी स्वप्न दाखवायचं काम करु नये"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.