उपवास करणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी; तज्ज्ञांचं महत्त्वाचं निरीक्षण

मात्र उपवास हा कोरोना लसीकरणाचा पर्याय नाही, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
Covid 19
Covid 19Sakal
Updated on

नियमितपणे उपवास करणाऱ्या लोकांना कोरोनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका तुलनेने कमी असतो, असं एका नव्या अभ्यासातून समोर आलं आहे. जे लोक नियमितपणे उपवास करतात त्यांना अनेक लाभ मिळतात तसंच त्यांना डायबेटिस आणि हृदयविकाराचा धोका कमी असतो, असंही निरीक्षण या अभ्यासातून नोंदवण्यात आलं आहे. (Covid 19 News)

बीएमजे न्यूट्रिशन, प्रीव्हेन्शन अँड हेल्थ या साप्ताहिकात हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. जे कोरोना (Covid 19) रुग्ण नियमितपणे केवळ पाणी पिऊन उपवास करतात, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा किंवा मृत्यूचा धोका उपवास न करणाऱ्यांच्या तुलनेत कमी असतो, असं या अहवालात नमूद कऱण्यात आलं आहे. उपवासामुळे हृदयविकारांचा (Heart Disease) धोका कमी होतो, हे या आधीही समोर आलं आहे. अमेरिकेतले संशोधक बेंजामिन होर्ने यांनी सांगितलं की, आम्ही उपवासाचे (Intermittent Fasting) आणखी फायदे काय आहेत याचा शोध घेत आहोत. जे लोक अनेक दशकांपासून उपवास करतायत, त्यांना काय फायदे होतात, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे.

Covid 19
COVID-19 vs Allergy: असा ओळखा अ‍ॅलर्जी अन् कोरोना लक्षणांमधील फरक

या अभ्यासामध्ये मार्च २०२० आणि फेब्रुवारी २०२१ या काळात जेव्हा लस उपलब्ध नव्हती, तेव्हा कोरोना झालेल्या २०५ जणांचा अभ्यास केला. यामध्ये ७३ जण महिन्यातून किमान एकदा नियमितपणे उपवास करतात. या लोकांचं रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडण्याचं प्रमाण किंवा कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे. कारण १२-१४ तास उपवास केल्यानंतर शरीर ग्लुकोज ऐवजी रक्तातलं कीटोन आणि लिनोलेक अॅसिड वापरू लागतं. कोरोनाच्या पृष्ठभागावर असलेल्या एका खाचेमध्ये हे लिनोलेक अॅसिड चिकटून बसतं ज्यामुळे हा विषाणू (Coronavirus) इतर पेशींना चिकटत नाही.

Covid 19
ऐलियन्सने फुग्यांमध्ये भरून कोरोना व्हायरस पृथ्वीवर फेकला; किम जोंग यांचा दावा

उपवासाचा आणखी एक फायदा म्हणजे उपवासामुळे शरीराला खराब झालेल्या पेशी नष्ट करण्यात आणि त्यांचा पुनर्वापर करण्यास मदत होते. होर्ने यांनी हेही विशेष नमूद केलं की, हे फायदे त्याच लोकांना मिळतात ते अनेक वर्षे, दशके उपवास करत आहेत. काही आठवड्यांच्या उपवासाने फायदे मिळणार नाहीत. मात्र उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मात्र उपवास हा कोरोना लसीकरणाचा पर्याय नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()