‘‘भारताने जगाला बुद्ध दिला आहे, हे मी संयुक्त राष्ट्रसंघात सांगितले होते. शांततेसारखे दुसरे मोठे कसलेही सुख नाही.''
नवी दिल्ली : ‘‘बुद्धाचा संदेश हा मानवतेचा मार्ग आहे. युद्धापासून लांब राहत मानवतेची सेवा केली तर जग वाचू शकते,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अधिधम्म दिवसानिमित्त (Abhidhamma Day) विज्ञान भवन (Vigyan Bhavan in New Delhi) येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. भगवान बुद्धांचा (Lord Buddha) अधिधम्म, त्यांची वाणी आणि शिक्षण ज्या पाली भाषेच्या माध्यमातून जगाला प्राप्त झाली, त्या पाली भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला असल्याचे मोदी यांनी नमूद केले.