रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश

एटीएस-पोलिसांची कारवाई; दोन संशयितांना अटक, महिनाभरात १०० आंतरराष्ट्रीय कॉल झाल्याचे उघड
आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश
आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश
Updated on
  • दृष्टिक्षेप...

  • मुंबई ‘एटीएस'च्या माहितीवरून कारवाई

  • मुख्य सूत्रधार ताब्यात

  • चुकीच्या पद्धतीमुळे वेधले लक्ष

  • दहशतवादी कृत्याच्या दृष्टीने तपास

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी रत्नागिरी शहरात बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई एटीएसच्या माहितीवरून रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केली. यात गेल्या महिनाभरात १०० आंतरराष्ट्रीय कॉल झाल्याचे उघड झाले आहे. ते नेमके कुठे आणि कशासाठी झाले, याचा तपास मुंबई एटीएस आणि शहर पोलिस करीत आहेत. सेंटरचे सर्व साहित्य जप्त करून शहरातील मोबाईल शॉपीच्या मालकासह पनवेल येथील सूत्रधाराला अटक केली आहे.

Summary

एटीएस-पोलिसांची कारवाई; दोन संशयितांना अटक, महिनाभरात १०० आंतरराष्ट्रीय कॉल झाल्याचे उघड

देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय कॉलवर मुंबई एटीएसचे बारीक लक्ष आहे. याबाबतचे सेंटर रत्नागिरीत असल्याचे समजल्यावर मुंबई एटीएसने (दहशतवादीविरोधी पथक) रत्नागिरी जिल्हा दहशतवादीविरोधी कक्षाला त्याची माहिती दिली आणि त्यानंतर कारवाई सुरू झाली. हे आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर आठवडा बाजार येथील श्रीटेकचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात होते. तिथे मुख्य सर्व्हर बसविण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. इंटरनॅशनल कॉलिंगसाठी मोठी हुशारी संशयितांनी दाखविली आहे.

रत्नागिरीतील स्थानिक माणसाकडून इंटरनॅशनल कॉलसाठी लागणारे सर्व साहित्य घेतले होते. एका प्रसिद्ध कंपनीचे ब्रॉडबॅण्ड कनेक्शन नाशिकमधून घेण्यात आले. धक्कादायक म्हणजे सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर वांद्रेमधील (मुंबईत) एका इमारतीत सुरू होते. त्याची माहितीही पोलिसांना मिळाली आणि स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी या सेंटरचा पर्दाफाश झाला.

या कारवाईत इंटरनॅशनल कॉलिंगसाठी बसविण्यात आलेल्या सर्व्हरसह दुकानमालक अलंकार अरविंद विचारे (रा. छत्रपतीनगर, रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणातील मास्टरमाईंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) हा रत्नागिरीत येत असल्याची माहिती रत्नागिरी एटीसीला मिळाली होती. या माहितीवरून साळवी स्टॉप येथे सापळा रचण्यात आला. पोलिसांनी फैसल याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध भारचीय दंडविधान कलम ४२०, ३४, आयटी ऍक्ट ४६ (ह), ६६ (ड), इंडियन टेलिग्राफीक ऍक्ट ४, २०, २५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक अनिल लाड याचा पुढील तपास करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश
सिंधुदुर्गला मोठा दिलासा; 15 ऑगस्टपासून सर्व दुकाने खुली

चुकीच्या कॉलिंगमुळे प्रकार उघड

आंतरराष्ट्रीय कॉल करण्यास परवानगी आहे. आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) अॅड्रेसवरून दुसऱ्या आयपी अॅड्रेसवर कॉल केला जातो. हे सर्व कॉल सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेस होतात. आयपी अॅड्रेस टू मोबाईल किंवा लॅण्डलाईन कॉल केल्यास ते ट्रेस होत नाहीत. दहशतवादी जेव्हा रेंज नसते, तेव्हा या यंत्रणेचा वापर करतात. रत्नागिरीतून बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याचे मुंबई एटीएसच्या लक्षात आले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.