International Civil Aviation Day : एअर इंडियाच्या पहिल्या परदेशी विमानाचं तिकीट किती होतं माहितीये का?

एअर इंडिया सामान्यांना परवडणारी आणि आरामदायी विमान सेवा देणारी कंपनी म्हणून देशात आणि देशाबाहेर ओळखली जाते.
Air India
Air India Sakal
Updated on

International Civil Aviation Day : एअर इंडिया सामान्यांना परवडणारी आणि आरामदायी विमान सेवा देणारी कंपनी म्हणून देशात आणि देशाबाहेर ओळखली जाते. आज आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन साजरा केला जात आहे. आज आपण एअर इंडियाने पहिल्यांदा केव्हा आंतरराष्ट्रीय उड्डाण केव्हा भरलं होतं आणि त्या प्रवासात कोण-कोण होतं यासोबतच त्याचं भाडं किती होते हे जाणून घेणार आहोत.

Air India
Air India-Vistara Merge : टाटांचा विस्तार वाढला; 'एअर इंडिया' अन् 'विस्तारा'चं होणार विलीनीकरण

एअर इंडियाच्या लॉकहीड L-749 या विमानाने 8 जून 1948 मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण घेतले होते. हे विमानाने कैरो, जिनिव्हा मार्गे लंडन असा ५००० मैलांचा प्रवास पार केला होता. या विमानाची कमांड केआर गुजदार यांच्या हातात होती. त्यावेळी या विमानाला लंडन येथे पोहोचण्यास ४८ तास लागले होते. पहिल्यांदाच विमान भारताबाहेर प्रवास करणार असल्याने एअर हॉस्टेसेसनादेखील विशेष ट्रेनिंग देण्यात आले होते. आज लंडनला जाण्यासाठी केवळ १० तास लागतात.

Air India
Air India New Guidelines : टाटांच्या एअर इंडियात आता नखरा चालणार नाही, टिकलीसाठी नवी नियमावली

विमानात होते दिग्गज मंडळी

एअर इंडियाने ज्यावेळी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय उड्डाण केले त्यावेळी या विमान प्रवासात जेआरडी टाटा आणि जामनगरचे नवाब अमीर अली खान यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रवास केला होता.

जाहिरातीने वेधलं होतं अनेकांचं लक्ष

ज्यावेळी पहिल्यांदा एअर इंडियाचे विमान परदेशात उड्डाण भरणार होते. त्यावेळी एअर इंडियाकडून ३ जून १९४८ रोजी एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. ज्यामध्ये कहिरा,जिनिव्हा मार्गे लंडनला उड्डाण भरा माझ्यासमवेत तेही केवळ रु. १,७२० रुपयांमध्ये अशी जाहिरात केली होती. आज लंडनला जाणाऱ्या विमानांचे भाडे साधारण २० हजार रुपयांपासून सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.