Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

Bitcoin worth Rs 130 crore seized: ईडीला लिस्टनच्या नावाशी जोडलेले बिटकॉइन्स मिळाले जे विविध देशांमध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीतून गुन्ह्यातून मिळालेले पैसे होते.
International drug mafia Banmeet Narula
International drug mafia Banmeet NarulaEsakal
Updated on

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया बनमीत नरुलाच्या हल्दवानी घरातून ईडीने २६८ बिटकॉइन्स जप्त केले आहेत. भारतीय रुपयांमध्ये त्यांची किंमत सुमारे 130 कोटी रुपये आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, बनमीत आणि त्याच्या भावाने याचा वापर डार्क वेबद्वारे ड्रग्ज खरेदी-विक्री करण्यासाठी केला होता.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नुकतेच सांगितले की, त्यांनी 130 कोटी रुपयांहून अधिक किमतीची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे आणि अमेरिकन अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून सुरू केलेल्या ड्रग्सच्या तस्करीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून उत्तराखंडमधील एका व्यक्तीला अटक केली आहे.

परिसराची झडती घेतल्यानंतर आरोपीला २७ एप्रिल रोजी नैनितालमधील हल्द्वानी येथून ताब्यात घेण्यात आले होते. (Bitcoin worth Rs 130 crore seized by ED)

केंद्रीय तपास यंत्रणेने सांगितले की, आरोपी डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकायचे. बहुतेक युरोपियन देशांमध्ये त्यांचे ग्राहक असायचे. अमेरिकन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या विनंतीच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली.

परविंदर सिंग आणि त्याचा भाऊ बनमीत सिंग आणि इतर काही जण सिंग डीटीओ नावाची आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीची रिंग चालवत असल्याचा आरोप आहे. त्यांनी क्रिप्टोकरन्सी व्यवहारांद्वारे डार्क वेब मार्केटमध्ये विकून पैसे उभे केले.

International drug mafia Banmeet Narula
Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

आरोपींनी सिल्क रोड 1, अल्फा बे आणि हंसा सारख्या डार्क वेब मार्केट्सवर लिस्टन नावाचा वापर केला होता.

ईडीला लिस्टनच्या नावाशी जोडलेले बिटकॉइन्स मिळाले जे विविध देशांमध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीतून गुन्ह्यातून मिळालेले पैसे होते. एजन्सीने सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांनी हजारो कोटी रुपयांची बिटकॉइन्स आधीच जप्त केली आहेत.

International drug mafia Banmeet Narula
Chikkodi Lok Sabha : मोदी दहा वर्षांपासून देशाची फसवणूक करताहेत, 15 लाखाचं काय झालं? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल

अलीकडेच, उत्तराखंडमध्ये एलएसडीची आतापर्यंतची सर्वात मोठी खेप डेहराडून पोलिसांनी पकडली होती. तस्कर डार्क वेबच्या माध्यमातून एलएसडी मागवत असल्याचेही समोर आले आहे.

डार्क वेब हा इंटरनेटचा असा पैलू आहे ज्याकडे सामान्यतः लक्ष दिले जात नाही. बिटकॉइन आणि त्यासारख्या अनेक आभासी चलनांचा व्यापार डार्क वेबवर केला जातो. त्यांच्या ऑपरेशनमध्ये कोणतेही बँक खाते किंवा त्याचे नेटवर्क वापरले जात नाही. त्याऐवजी, ते त्यांच्या स्वत: च्या सर्व्हरवर कार्य करतात.

अशा परिस्थितीत पोलीस किंवा इतर तपास यंत्रणांना डार्क वेबवर कोण आणि कोणत्या वेळी सक्रिय आहे याचा थेट शोध घेता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.