पायलटला हृदयविकाराचा झटका; बांग्लादेशच्या विमानाचं नागपुरात लँडींग

पायलटला हृदयविकाराचा झटका; बांग्लादेशच्या विमानाचं नागपुरात लँडींग
Picasa
Updated on

नवी दिल्ली : ओमानची राजधानी असलेल्या मस्कतवरुन ढाक्याला येणाऱ्या बांग्लादेशातील 'बिमान बांग्लादेश'च्या एका विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडींग करावं लागलं आहे. हे विमान जेंव्हा रायपूरवरुन जात होतं तेंव्हा या पायलटला हृदविकाराचा झटका आला. त्यानंतर विमानाने तात्काळ कोलकाता एटीसीला संपर्क केला. तसेच सद्यपरिस्थितीची जाणीव करुन दिली. पायलटच्या तब्येतीची माहिती मिळताच कोलकाता एटीसीने समन्वय करुन विमानाचे नागपुर एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडींग करण्याचे आदेश दिले. या विमानात 126 प्रवासी होते.

पायलटला हृदयविकाराचा झटका; बांग्लादेशच्या विमानाचं नागपुरात लँडींग
'आपल्याच वहिनीवरती ॲसिड फेकण्यास कोणी सांगितलं?'

कॅप्टनला केलं दवाखान्यात भरती

बांग्लादेशचे हे विमान नागपूरमध्ये सुरक्षितरित्या उतरवलं गेलं आहे. तसेच या विमानातील सगळे प्रवासी सध्या सुरक्षित आहेत. कोलकाता एटीसीने हजरजबाबीपणा दाखवत बांग्लादेशच्या या विमानाला नागपूरमध्ये उतरण्याची परवानगी दिली. जर ही परवानगी दिली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. विमानाचं लँडींग झाल्यानंतर कॅप्टनला दवाखान्यात भरती करण्यात आलं. सध्या या विमानातील प्रवासी एअरपोर्टवर थांबून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()