International Yoga Day : जगाच्या कल्याणासाठी योग प्रभावी माध्यम; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

‘योग हे जगाच्या भल्याचे प्रभावशाली माध्यम आहे. जम्मू- काश्मीरच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे स्थित्यंतर घडवून आणत ते जगभरातील पर्यटकांना आकर्षित करू शकते.
Narendra Modi Yoga
Narendra Modi Yogasakal
Updated on

श्रीनगर - ‘योग हे जगाच्या भल्याचे प्रभावशाली माध्यम आहे. जम्मू- काश्मीरच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे स्थित्यंतर घडवून आणत ते जगभरातील पर्यटकांना आकर्षित करू शकते. योग हे केवळ ज्ञान नाही तर विज्ञान देखील आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

‘जेव्हा लोक हे योगाबाबत बोलतात तेव्हा त्याच्या मनामध्ये केवळ आध्यात्मिक प्रवासच असतो. ते अल्ला, ईश्वर आणि अन्य देव असा विचार करतात. आध्यात्मिक प्रवास थोडा बाजूला ठेवा, तो नंतर कधीही करता येऊ शकेल. आता तुम्ही वैयक्तिक विकासावर भर द्या, योग हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

तुम्ही या दृष्टीने त्याचा विचार केला तर निश्चितपणे याचे तुम्हाला खूप फायदे होतील. वैयक्तिक फायद्यांमधून समाजाचे देखील फायदे होतात, याचा लाभ शेवटी मानवजातीलाच होतो,’ असे मोदी यांनी सांगितले.

दरम्यान योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम हा खुल्या मैदानामध्येच घेतला जाणार होता पण पावसामुळे मुख्य केंद्रात त्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांसमवेत योगासने देखील केली. मुख्य कार्यक्रमानंतर अनेकांनी पंतप्रधानांसोबत सेल्फी घेतला.

जगाला फायदा समजला

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘जगभरामध्ये योगाचे महत्त्व वाढत चालले आहे, त्याचे फायदे देखील लोकांच्या लक्षात येऊ लागले आहेत. मी जगभरात विविध देशांमध्ये नेत्यांना भेटतो तेव्हा ते आवर्जून योगशास्त्राचा उल्लेख करतात. अनेक देशांमध्ये योग हा लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.’’ केवळ योगशास्त्राचे धडे घेण्यासाठी भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे. उत्तराखंड आणि केरळमध्ये योगपर्यटन चांगलेच बहरले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले...

  • अनेकजण वैयक्तिक योग प्रशिक्षक नेमत आहेत

  • अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना योगाचे धडे देतात

  • योगशास्त्रामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या

  • योगामुळे मन एकाग्र व्हायला मदत होते

  • काश्मीरमध्ये हजारो लोक योगाशी जोडल्या गेले

जगभर योग दिनाचा उत्साह

  • जगभरामध्ये आज विविध देशांत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावासाकडून टाइम्स स्क्वेअर परिसरामध्ये योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सध्या अमेरिकेमध्ये उष्णतेची लाट असल्याने शेकडो नागरिकांनी पहाटेच योगासने करण्यावर भर दिला.

  • वॉशिंग्टनमधील योग सत्रात भारताच्या उपराजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी मार्गदर्शन केले.

  • इस्राईलची राजधानी तेलअवीवमध्ये आयोजित कार्यक्रमात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

  • सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, इंडोनेशिया, इटली आणि फ्रान्समध्येही योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

मी नुकताच इजिप्तमधील एक व्हिडिओ पाहिला त्यांनी सर्वोत्कृष्ट योगविषयक छायाचित्रे आणि व्हिडिओची स्पर्धा आयोजित केली होती. ऐतिहासिक पिरॅमिडसमोर एक युवती योग करताना दिसते तेव्हा ते दृश्य खूप आकर्षक असते.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

दिवसभरात

  • राष्ट्रपतींसह, केंद्रीयमंत्री योगदिन कार्यक्रमात सहभागी

  • जगभरातील विविध देशांत योगदिनानिमित्त कार्यक्रम

  • न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये योगदिनाचा कार्यक्रम

  • काँग्रसकडून योगदिनाचे श्रेय पंडित नेहरूंना

  • लष्कराची त्रिशक्ती कोअर कार्यक्रमामध्ये सहभागी

  • आसाम रायफल्सचे जवान योग सत्रामध्ये सहभागी

  • थारच्या वाळवंटामध्ये ‘बीएसएफ’कडून योगासने

  • जलतरणपटूंची यमुना नदीमध्ये योगासने

  • लडाखमध्ये ‘आयटीबीपी’च्या जवानांचाही योग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.