नवी दिल्ली - विविध विमान कंपन्यांना समाजकंटकांकडून सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता कठोर कारवाई करण्याची तयारी चालविली आहे. अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले जाऊ शकते अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री के. राममोहन नायडू यांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता त्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना आखण्यात येतील असे नायडू म्हणाले.