Adhiraranjan Chaudhary : तृणमूलमध्ये पक्षांतर्गत संघर्ष; काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांचा दावा

तृणमूलने नुकतीच या उमेदवारांची यादीही जाहीर केली
Adhiraranjan Chaudhary
Adhiraranjan Chaudharyesakal
Updated on

कोलकता : ‘‘तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत संघर्ष सुरू असून त्यांनी जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीवरून ते स्पष्ट दिसत आहे, तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर लोकांचा विश्‍वास नसल्याने कदाचित त्यांना आयात केलेल्यांना उमेदवारी द्यावी लागत असेल’’ असा दावा काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.

Adhiraranjan Chaudhary
Kitchen Tips : किचनमधील या वस्तू कधीच फेकून देऊ नका, कारण...

तृणमूल काँग्रेसने पश्‍चिम बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तृणमूलने नुकतीच या उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये सहभागी असूनही राज्यात मात्र तृणमूलने इंडिया आघाडीतील घटक पक्षांसाठी एकही जागा सोडलेली नाही. यावरून काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी तृणमूलवर जोरदार टीका केली आहे.

Adhiraranjan Chaudhary
Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, तृणमूलमध्ये अंतर्गत कलह असून, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी या दिशाहीन झाल्या आहे. तृणमूलच्या वतीने घेण्यात आलेली सभा ही राजकीय कमी आणि एखादा ‘कॉर्पोरेट इव्हेंट’ अधिक वाटत होती. तृणमूल काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट असून त्यांनी जाहीर केलेल्या यादीतून ते स्पष्ट होत आहे. अधीररंजन चौधरी यांच्या बहरामपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसने गुजरातचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे, याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, ‘‘देशात कोणालाही कुठूनही आणि कोणत्याही पक्षातून निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, मात्र ज्यांनी उमेदवारी देण्यात आली आहे ती योग्य आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तृणमूल काँग्रेसने आयात केलेले उमेदवार दिले आहेत. कदाचित त्यांना याची जाणीव झाली असेल की,तृणमूलच्या स्थानिक नेत्यावर लोकांचा विश्‍वास नाही.’’

चौधरी म्हणाले...

-बहरामपूरमधील लोकांचा आशीर्वाद माझ्या बाजूने

-मी पराभूत झाल्यास राजकारण सोडेन, परंतु विजयी झाल्यास ममता दीदींनी राजकारण सोडतील का?

-पंतप्रधान मोदी यांच्याशी संघर्ष होईल असे कोणतेही पाऊल ममता दीदी उचलणार नाहीत

-‘इंडिया’मध्ये फूट पडल्यास मोदींना सर्वांत जास्त आनंद होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.