गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; पाटणसह राज्यातील हजारोंची कालिकाई

संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा
Investment Billion Fraud Agro Multistate
Investment Billion Fraud Agro Multistatesakal
Updated on

पाटण : ठाणे- मुंबई येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को. ऑ. सोसायटी या मल्टिस्टेट कंपनीने मुंबई, ठाणे, कोकण पश्चिम महाराष्ट्रसह पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. या फसवणूकप्रकरणी गुंतवणूक प्रतिनिधी यांनी कंपनीच्या संचालक मंडळाविरोधात सुरुवातीला पाटण पोलिसांत व पुन्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे शहर येथून कंपनीचे चेअरमन अरुण आर. गांधी, संचालक आदित्य हेमंत रेडीज या दोघांना अटक केले. त्यांना कऱ्हाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या घोटाळ्याशी संबंधित इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे सांगून त्यांनाही लवकर अटक करू, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डी. एस. पवार यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कालिकाई इंडस्ट्रीज इंडिया लि. आणि संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि. ठाणे या एकच फर्म असलेल्या कंपनीने ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना आर्थिक गुंतवणुकीच्या दीडपटीने, डबल, तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून माहे ऑक्टोबर २०१२ पासून ते २०१८ अखेर आर्थिक गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू केला. या कंपनीत गुंतविलेल्या रकमेची मुदत संपून चार ते पाच वर्षांचा कालावधी संपून गेला, तरी गुंतवलेली रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणूक प्रतिनिधींनी पाटण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याची दखल न घेतल्याने गुंतवणूक प्रतिनिधींनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत गुन्हा पोलिस अधीक्षकांनी सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. या गुन्ह्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्याने आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत या कंपनीचे चेअरमन अरुण आर. गांधी, संचालक आदित्य हेमंत रेडीज या दोघांना ठाणे येथून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा सातारा यांनी संशयितांना कऱ्हाड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सहायक पोलिस प्रमुख अजित बोऱ्हाडे, सातारा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक एम. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डी. एस. पवार यांच्यासह तपास पथकातील पोलिस अंमलदार प्रशांत नलावडे, नीलेश चव्हाण, आर. एन. वायदंडे, पी. पी. नलावडे, अजित पवार हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.