IRCTC News : पुढच्या आठवड्यात नवरात्रोत्सव सुरू होत आहे. याकाळात आदिशक्तीच्या विविध शक्तीपिठांच्या दर्शनासाठी भक्त जातात. यातही वैष्णव देवीला जाणाऱ्या भक्तांचा ओघ मोठा असतो. हेच लक्षात घेऊन IRCTC कडून २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान दोन भारत गौरव टूरिस्ट ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. या पाच दिवसांच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना उत्तम सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
या मिळतील सुविधा
यात आधुनिक किचन कारद्वारा प्रवाशांना चविष्ट शाकाहारी जेवण पुरविण्यात येईल.
ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मनोरंजन व प्रवासाच्या माहिती देण्यासाठी इन्फोटेन्मेंट सिस्टम लावण्यात आली आहे.
स्वच्छ स्वच्छतागृह, सुरक्षा गार्ड व बोगीत सीसीटिव्ही कॅमेरे पण लावलेले असणार.
या रेल्वे प्रवासाच्या टूर पॅकेज च्या किमतीत बऱ्याच सुविधा दिल्या आहेत.
पर्यटन स्थळांसाठी बस सुविधा
राहण्यासाठी हॉटेलची सुविधा
गाईड
शिवाय सरकारी किंवा पीएसयूचे कर्मचारी या प्रवासासाठी एलटीसी सुविधाही घेऊ शकतात.
कसे करावे बुकिंग?
याचे बुकिंग सुरू झाले आहे. इच्छूक प्रवासी https://www.irctctourism.com या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन बुकिंग करू शकतात. बुकिंग सुविधा केवळ अधिकृत संकेतस्थळावर उपल्ब्ध आहे. प्रथम येणाऱ्यास प्रधान्य तत्वावर ते दिले जात आहे.
कुठून निघणार ट्रेन?
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान संध्याकाळी ७ वाजता भारत गौरव पर्यटक ट्रेन कटरा साठी निघेल. या ट्रेनसाठी गाजियाबाद, मेरठ, मुजफ्फरनगर, सहारनपूर, अंबाला कँट, सरहिंद व लुधियाना या ठिकाणांहून देखील प्रवासाला सुरूवात करता येईल. जर पठाण कोटला ५० प्रवासी असतील तर तेथे याचा विशेष स्टॉप करण्यात येईल.
किती आहे खर्च?
वैष्णव देवीची ४ दिवस ५ रात्रींच्या प्रवासाच्या पॅकेजचा खर्च प्रत्येकी १३ हजार ७९० रूपये आहे. जर दोन जणांचे एकत्र तिकीट घेतले तर प्रत्येकी ११ हजार ९९० रूपये शुल्क लागेल. तर ५ ते ११ वर्षा दरम्यान वयोगटातील मुलांसाठी १० हजार ७९५ रूपये शुल्क निर्धारीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.