IRCTC साईट झाली ठप्प, पण तत्काळ तिकिटांसाठी अजूनही संधी आहे, कुठे बुक करायचे जाणून घ्या

Tatkal Ticket Booking: तांत्रिक बिघडामुळे भारतीय ऑनलाइन रेल्वे तिकीट सुविधा बंद, नागरिक वैतागले
IRCTC Tatkal Ticket Booking Marathi Guide
IRCTC Tatkal Ticket Booking Marathi GuideEsakal
Updated on

Tatkal Ticket Booking: तांत्रिक कारणांमुळे IRCTC ची वेबसाइट आणि अॅप ठप्प झाले आहे. तांत्रिक कारणांमुळे तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध होत नाही. यासंबधी माहिती देताना आयआरसीटीसीने सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध नाही. आमची तांत्रिक टीम समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

रेल्वे तिकीट बुकिंग कंपनी IRCTCचे अॅप आणि वेबसाइट ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट काढता येत नाही.

तांत्रिक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नसल्याचे IRCTCने म्हटले आहे. तांत्रिक टीम ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे. लवकरच अॅप आणि वेबसाइट सुरू केले जाईल. Amazon, Makemytrip इत्यादी इतर B2C प्लेअरद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात.

बुकिंगसाठी तुम्ही Ask disha पर्याय निवडू शकता. तसेच, तुमच्या IRCTC ई-वॉलेटमध्ये पैसे असल्यास, तिथूनही तिकिटे बुक करता येतील. तसेच, तुम्ही रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून तिकीट बुक करू शकता.

याआधी 6 मे रोजी IRCTC ची सेवा ठप्प झाली होती त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्या काळातही साईट डाऊन झाल्यामुळे मेंटेनन्सचा हवाला देण्यात आला होता.

आयआरसीटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, काल रात्रीपासून साइट बंद आहे. ते सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या, रेल्वेच्या एकूण आरक्षित तिकिटांच्या बुकिंगमध्ये IRCTC चा वाटा 80 टक्क्यांहून अधिक आहे. IRCTC अॅप आणि साइट स्टॉल झाल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. काही लोकांनी आयआरसीटीसीला टॅग करून ट्विट केले आहे.

IRCTC Tatkal Ticket Booking Marathi Guide
RPF Children Rescue : हरवलेल्या 408 मुलांची सुटका; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’तून आरपीएफची कामगिरी

तिकीट कुठे बुक करू शकता

जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकत नसाल तर घाबरण्याचे काही नाही. बुकिंगसाठी तुम्ही Ask disha पर्याय निवडू शकता. याशिवाय तुमच्या IRCTC ई-वॉलेटमध्ये पैसे असतील तर तिथून तिकीट बुकिंगही करता येईल.

तसेच तुम्ही रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून तिकीट बुक करू शकता. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, पर्यायाने Amazon, Makemytrip इत्यादी सारख्या B2C प्लॅटफॉर्मवरून तिकिटे बुक करता येतील.

IRCTC Tatkal Ticket Booking Marathi Guide
Chatrapati Sambhaji Nagar : वाहतुकीची फुटणार कोंडी रेल्वेच्या भुयारी मार्गासाठी शिवाजीनगर येथे पाडापाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.