Amazon Indiaच्या प्रमुखांना EDचं समन्स!

१,४०० कोटी रुपयांचा झाला आहे व्यवहार
Amazon
AmazonGoogle
Updated on

नवी दिल्ली : फ्युचर ग्रुप आणि अॅमेझॉन इंडिया यांच्यामध्ये झालेल्या डीलमध्ये अनियमितता झाल्याची सरकारला शंका आहे. यापार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीनं अॅमेझॉन इंडियाचे हेड अमित अग्रवाल यांना समन्स पाठवलं आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. अॅमेझॉननं सन २०१९ मध्ये १,४०० कोटी रुपयांच्या व्यवहारात फ्युचर रिटेलमध्ये ४९ टक्के भागिदारी खरेदी केली होती.

Amazon
मी मंत्रिपदाची शपथ घेतल्याचं लोकांना पचत नाही, भुजबळांचा विरोधकांना टोला

या डीलमध्ये परदेशी चलनासंदर्भात भारतीय कायदे किंवा परदेशी चलन नियोजन अधिनियमाचं (फेमा) उल्लंघन झालंय की नाही याची चौकशी ईडी या प्रकरणी करणार आहे. याप्रकरणी अॅमेझॉन इंडियाविरोधात फेमाबाबत या वर्षी जानेवारीमध्ये केस दाखल करण्यात आली होती. अॅमेझॉन आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये दिल्ली हायकोर्टातील लढाईनंतर काही टिप्पणीनंतर ईडीनं हे समन्स बजावलं आहे.

Amazon
Omicron : केंद्राचं राज्यांना पत्र, योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना

तीन करारांच्या (फ्युचर कुपनसोबत फ्युचर रिटेल शेअरधारकांचा करार, अॅमेझॉनसोबत फ्चुचर कूपन शेअरधारकांचा करार आणि अॅमेझॉनसोबत फ्चुचर कूपनचं शेअर सबस्क्रिप्शन करार) पार्श्वभूमीवर हायकोर्टानं म्हटलं होतं की, अॅमेझॉननं फ्युचर रिटेलचं अधिग्रहण सरकारच्या परवानगीशिवाय केलं आहे. यामुळं फेमा आणि FDI च्या नियमांचं उल्लंघन झालं आहे.

दरम्यान, अॅमेझॉन इंडियानं यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आम्हाला ईडीचं समन्स मिळालं आहे. दिलेल्या कालावधीत आम्ही ईडीला प्रतिसाद देऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.