Sam Pitroda on Ram Temple: काँग्रेस नेते सॅम पित्रोदांचं पुन्हा राम मंदिराबाबत भाष्य; म्हणाले, महागाई, बेरोजगारीचं...

PM मोदी देशाचे पंतप्रधान आहेत फक्त एकाच पक्षाचे नाहीत, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीकाही केली.
Sam-Pitroda
Sam-Pitroda
Updated on

नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनाचं वातावरण आता देशभरात तयार होत आहे. भाजपनं पद्धतशीरपणे सर्वच माध्यमातून याचा प्रचार होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा इव्हेंट भाजपसाठी सर्वात वरचा राजकारणाचा मुद्दा आहे.

यावरुनच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन सॅम पित्रोदा यांनी काही सवाल उपस्थित करत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. (Is Ram Mandir real issue talk about inflation employment says Congress leader Sam Pitroda)

पित्रोदा म्हणाले, मला कुठल्याही धर्माशी कुठलाही प्रॉब्लेम नाही. मंदिराला एकदा भेट द्यावी इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही त्याला प्रमुख आणि महत्वाचा मुद्दा ठरवू शकत नाही. देशात ४० टक्के लोकांनी भाजपला मतदान केलं आहे. तर उर्वरित ६० टक्के लोकांनी नाकारलेलं आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण सर्वांचे पंतप्रधान आहोत फक्त एका पक्षाचे नाहीत, हा संदेश त्यांनी देशवासियांना द्यायला हवा.

त्यांनी महागाई, बेरोजगारी, सायन्स अँड टेक्नॉलॉजीबाबत बोललं पाहिजे. देशासमोरचे खरे मुद्दे काय आहेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. राम मंदिर हा खरा मुद्दा आहे का? आपल्याकडं बेरोजगारी हा खरा मुद्दा आहे. राम मंदिर हा खरा मुद्दा आहे की, महागाई हा खरा मुद्दा आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

Sam-Pitroda
Israel Embassy Incident : दिल्लीतील इस्त्रायली दुतवासाबाहेरील स्फोट प्रकरणात मोठी अपडेट! CCTVमध्ये आढळले 2 संशयित

पित्रोदा पुढे म्हणतात, तुमच्या धर्माचं तुम्ही पालन करा पण धर्म हा राजकारणापासून वेगळा ठेवा. यावेळी पित्रोदांनी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या सदस्यांना येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमचा मुद्दा गांभीर्यानं घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण हे ईव्हीएमच देशाचं नशिब ठरवणार आहे. काही विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता यावरुन त्यांनी हा सल्ला दिला आहे.

Sam-Pitroda
नव्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर; पाहा किती अन् कधी असणार सुट्ट्या?

इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरही पित्रोदांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणूक विचारधारेच्या मुद्द्यावर लढवायला हवी. राज्यघटनेचं संरक्षण कोण करेल? तुमच्या लोकशाहीला कोण पुढे घेऊन जाईल? नोकऱ्या कोण उपलब्ध करुन देईल? तसेच तुमच्या आरोग्याची, पायाभूत सुविधांची काळजी कोण घेईल? हे पाहिलं पाहिजे. ही काय अध्यक्षीय निवडणूक नाही. त्यामुळं तुम्हाला चेहऱ्याची गरज नाही तर देशाला पुढे नेणाऱ्या विचारांची आणि कल्पनांची गरज आहे. ही निवडणूक मोदी विरुद्ध कोणीतरी अशी नाही. इंडिया आघाडीत उच्चशिक्षित लोक आहेत. यांपैकी काहीजण वारंवार समोर येतात तर काहीजण नाही.

Sam-Pitroda
Share Market Today: शेअर बाजारात तेजी; आज कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

राहुल गांधीनी परदेशात जाऊन टीका करतात यावर बोलताना पित्रोदा म्हणाले, "आम्ही जेव्हा परदेशात असतो तेव्हा आम्ही भारतावर टीका करत नाही तर इथल्या सरकावर टीका करत असतो. या दोन्ही गोष्टींमध्ये गोंधळ करु नका. भारत जगासाठी महत्वाचा आहे, त्यामुळं जागतीक स्तरावर देशाबाबत चर्चा करण्याचा आम्हाला अधिकार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे हुशार आणि उच्चशिक्षित व्यक्ती असून ते देशाचं नेतृत्व करु शकतात"

2024 ची निवडणूक जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त करताना सॅम पित्रोदा म्हणाले, "जर देशातील जनतेनं याचा विचार करायला हवा की त्यांना हिंहू राष्ट्र हवं की एक खरं धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवं ज्यामध्ये सर्वसमावेशकता, विविधता, रोजगार आणि विकास महत्वाचा असेल"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.