Pranav Pandey: क्रिकेटरच्या पप्पांचा JDU मध्ये प्रवेश; वडिलांचे नाव प्रणव पांडे, पण इशान आडनाव 'किशन' असं का लिहितो?

Pranav Kumar Pandey joins JDU: पाटणा येथील जेडीयू राज्य कार्यालयात, भारतीय क्रिकेटपटू इशान किशनचे वडील प्रणव पांडे नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाले आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा आणि प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले.
Pranav Kumar Pandey joins JDU
Pranav Kumar Pandey joins JDUESakal
Updated on

भारतीय क्रिकेटपटू इशान किशनचे वडील प्रणव कुमार पांडे यांनी रविवारी बिहारमधील सत्ताधारी पक्ष जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. प्रणव पांडे यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसह पाटणा येथील जेडीयू राज्य कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. जेडीयूचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा यांनी प्रवण पांडे यांना पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.

बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अशा स्थितीत राजकीय पक्ष आपापल्या गटाचा विस्तार करण्यात व्यस्त आहेत. प्रणव पांडे हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत. बिहारची राजधानी पाटणा येथे ते आपल्या कुटुंबासह राहतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आगामी विधानसभा निवडणुकीत नवादा किंवा ओब्रा विधानसभा मतदारसंघातून प्रणव पांडे यांना उमेदवारी देऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळेच पांडे यांचा जेडीयूमध्ये समावेश करण्यात आल्याचे मानले जात आहे.

Pranav Kumar Pandey joins JDU
WI vs SL : ३ वर्षांनी आला, 'वेड्या'सारखा खेळला; संघाच्या १९६ धावांमध्ये एकट्याने कुटल्या नाबाद १०२ धावा

अशा परिस्थितीत आता मुलगा इशान किशन क्रिकेटमध्ये तर वडील प्रणव पांडे राजकारणाच्या मैदानात फलंदाजी करताना दिसणार आहेत. मात्र, सध्या ईशान किशन बीसीसीआयच्या केंद्रीय कराराचा भाग नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या 15 सदस्यीय भारत अ संघाचा तो भाग आहे. त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होताच इशान किशनच्या भारतीय संघात पुनरागमनाच्या चर्चांना जोर आला आहे.

इशान त्याचे आडणाव किशन का वापरतो?

दरम्यान अनेकांना आता हा प्रश्न पडला आहे की इशानच्या वडिलांचे नाव प्रणव पांडे आहे. तर तो त्याचे आडणाव किशन का वापरतो. मात्र इशान किशनचे पूर्ण नाव इशान प्रणव कुमार पांडे किशन असं आहे. त्यामुळे तो आपले नाव इशान किशन असे लिहितो.

पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रणव पांडे म्हणाले की, नितीश कुमार यांनी बिहारच्या विकासाला गती दिली आहे. बिहारच्या जनतेने जो विकास केला आहे तो नितीशकुमार यांच्यामुळेच. आम्ही पक्षाचे सैनिक आहोत आणि पक्षासोबत काम करू आणि पूर्ण निष्ठेने काम करू. माझ्या मनात कोणताही विचार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.