कुलभूषण जाधव ISI च्या जाळ्यात कसे अडकले? पुस्तकातून खुलासा

Kulbhushan Jadhav
Kulbhushan Jadhav
Updated on
Summary

“स्पाय स्टोरीज - इनसाइड द सीक्रेट वर्ल्ड ऑफ द रॉ अँड आयएसआय” असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये अनेक धक्कादायक असे दावे करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : 26/11 हल्ल्यासंदर्भातील पुस्तक लिहिलेले ब्रिटिश पत्रकार एड्रियन लेवी आणि कॅथी स्कॉट क्लार्क यांनी नवीन पुस्तक लिहिलं आहे. “स्पाय स्टोरीज - इनसाइड द सीक्रेट वर्ल्ड ऑफ द रॉ अँड आयएसआय” असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये अनेक धक्कादायक असे दावे करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांविषयी काही कथित खुलासे यातून लेखकाने केले असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांच्याबाबतही पुस्तकात दावा करण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे की, इंटर सर्विसेस इंटेलिजन्स (ISI) ला माहिती होतं की, कुलभूषण जाधव एक लहान मासा आहे. तरीही त्यांनी मोठं यश मिळाल्याचं दाखवलं. याशिवाय भारतीय गुप्तचर संस्थांनी आधी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहाण वानीचे वर्चस्व असलेल्या परिसरात शिरकाव केला. मग त्याच्या नेटवर्कमध्ये परदेशी दहशतवादी येण्याची वाट पाहिली असाही दावा पुस्तकात केला आहे.

पुस्तकामध्ये 26/11 च्या हल्ल्याबाबत असा दावा केला आहे की, हल्ला होण्याआधी परदेशी संस्थांकडून भारताला 18 पानांचा एक सविस्तर असा अहवाल पाठवण्यात आला होता. त्यात सांगण्यात आलं होतं की, दहशतवादी मुंबईत कोणत्या मार्गाने येणार, ते कोणत्या ठिकाणी हल्ला करतील आणि त्यांची हल्ला करण्याची पद्धत कशी असेल. इतकी सारी माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचं पुस्तकात म्हटलं आहे.

Kulbhushan Jadhav
भारताने अफगाणिस्तानला गिफ्ट केलेले Mi-24 फायटर हेलिकॉप्टर तालिबानच्या ताब्यात

ISI आणि RAW च्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

लेखकाने अनेक लहान लहान विषय जोडून पुस्तकात मांडले आहेत. अनेक हाय प्रोफाइल अधिकारी आणि निवृत्त गुप्तहेरांशी चर्चा करण्यात आली आहे. मात्र यामध्ये माहिती देणारे सूत्र हे आयएसआय आणि रॉ यांच्याशी संबंधित दोन अधिकारी आहेत. यात आयएसआय अधिकाऱ्याने अनेक महत्त्वाच्या बाबी लेखकांना सांगितल्या आहेत. मेजर इफ्तिखार असं त्यांचं नाव असून काश्मीर सह आयएसआयच्या अनेक मोहिमांमध्ये ते सहभागी होते. तसंच रॉ चे माजी अधिकारी मोनिशा यांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे. मोनिशा सध्या भारतात नसून अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

ISI च्या जाळ्यात अडकले कुलभूषण

कुलभूषण जाधव यांना भारतीय गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून 2016 मध्ये बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अजुनही कुलभूषण जाधव हे पाकिस्तानमध्ये तुरुंगात आहेत. त्यांच्याबाबत लेखकाने पुस्तकात असं म्हटलं की, कुलभूषण जाधव यांना पकडण्यासाठी आयएसआयने कराचीतील उजैर बलूच नेटवर्कचा वापर केला होता. उजैर बलूचचे इराणी बलुचिस्तानशी घनिष्ठ असे संबंध आहेत. उजैर बलूच मोठा व्यापारी असून आयएसआयने त्याचा वापरा चाबहार शहरातील इराणी बंदरात हेरगिरीसाठी केला होता.

Kulbhushan Jadhav
'लोकशाहीची हत्या'; विरोधकांचे संसदेबाहेर आंदोलन

ISI ने कुलभूषण यांना पकडण्यासाठी पाहिली वाट

2014 मध्ये चाबहारमधील एका भागात आयएसआयने काही लोकांना पकडलं होतं. ते रॉ चे अधिकारी असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामध्ये एक व्यक्ती अशी होती ज्याची ओळख पटली नव्हती. मात्र ती व्यक्ती परिसरात सातत्याने येत जात होती. तो इराणी नव्हता मात्र असं वाटत होतं जसं समुद्री मालवाहतूकीचं काम करतो. लेखकाने आयएसआयच्या एका कर्नलचा उल्लेख करताना म्हटलं की, आयएसआयने जाधव यांना पकडण्यासाठी गडबड केली नाही. आयएसआय संधीच्या शोधात होते की कुलभूषण जाधव काही मोठं पाऊल उचलतील आणि त्यांना पकडता येईल.

कुलभूषण जाधव संसदेवर हल्ल्याने होते नाराज

ब्रिटिश लेखकाने पुस्तकात असाही दावा केला की, कुलभूषण जाधव हे 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याने नाराज होते आणि त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणांना मदत करण्याची तयारी दर्शवली होती. 26/11 च्या हल्ल्यानंतर चार वर्षांनी जाधव यांनी सांगितलं होती, त्यांचे बलूच कुटुंबियांसोबत चांगले संबंध बनले असून त्यांचा संपर्क थेट उजैर बलूचच्या जवळच्या नातेवाईकाशी झाला आहे. कुलभूषण यांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती की ते आयएसआयच्या जाळ्यात अडकत होते. जाधव यांचे ज्या बलूच कुटुंबाशी संपर्कात होते ते कुटुंब आयएसआयसाठी काम करत होते.

Kulbhushan Jadhav
तालिबान्यांचा आणखी तीन अफगाणी प्रांत राजधान्यांवर कब्जा

बुरहान वानीला आधीच मारता आले असते

काश्मीरमधील दहशतवादी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानीबाबत काही खुलासे पुस्तकात करण्यात आले आहेत. बुरहान वानीला 2016 मध्ये ठार केल्यानंतर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त कऱण्यात आला होता. लेवी आणि स्कॉट क्लार्क यांनी म्हटलं की, वानीला आधीच मारता आलं असतं. मात्र भारतीय एजन्सीजनी वानीच्या नेटवर्कमध्ये जाऊन त्याच्यावर नजर ठेवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.