ISIS Target Gujrat: गोध्रा हत्याकांडाच्या बदल्यासाठी गुजरात ISISच्या टार्गेटवर! अटकेतील दहशतवाद्याचे अनेक खळबळजनक खुलासे

दिल्ली पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी शाहनवाज आलम या दहशतवाद्याला अटक केली होती, त्याची सध्या चौकशी सुरु आहे.
ISI sets up Lashkar-e-Khalsa group in Punjab
ISI sets up Lashkar-e-Khalsa group in PunjabISI sets up Lashkar-e-Khalsa group in Punjab
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी शाहनवाज आलम या दहशतवाद्याला अटक केली होती, त्याची सध्या चौकशी सुरु आहे. पण या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. इसिसकडून गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी गुजरातमधील विविध धार्मिक स्थळं इसिसच्या टार्गेटवर होती. अनेक बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. (ISIS targets Gujrat for revenge of Godhra massacre many sensational revelations by detained terrorist Shahnawaz)

ISI sets up Lashkar-e-Khalsa group in Punjab
Bilkis Bano Case: गुजरात सरकारला न्यायालायाचा मोठा झटका! दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने केला रद्द

तीन शहरांना घालणार होते घेराव

शाहनवाजनं पोलिसांना सांगितलं की, इसिसचा हँडलर अबु सुलेमान याच्या सांगण्यावर दोन दहशतवाद्यांनी अहमदाबाद, वडोदरा आणि सुरतला घेराव घालण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी गुजरातचं प्रामुख्यानं टार्गेट करण्यात आलं होतं. शाहनवाजला गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीस होतं. (Latest Marathi News)

ISI sets up Lashkar-e-Khalsa group in Punjab
Mumbai Crime : आठ महिला पोलीस शिपायांवर वरिष्ठांकडून बलात्कार, व्हिडीओही बनवले; घटनेने खळबळ

कोणत्या ठिकाणांना बनवण्यात आलं होतं निशाणा?

चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी सांगितलं की, इसिसचे दहशतवादी ट्रेननं अहमदाबादेत पोहोचले आणि इथं तो दोन दिवस थांबले. पहिल्या दिवशी त्यांनी रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, विद्यापीठ, व्हीआयपी मार्ग, अटल पूल, गर्दीच्या बाजाराच्या ठिकाणांचं देखील निरिक्षण केलं. त्याचबरोबर बोहरा मुस्लिम समुदयाच्या मशीदी, दर्गे तसेच साबरमती आश्रमही त्यांच्या निशान्यावर होतं. एबीपी न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Marathi Tajya Batmya)

ISI sets up Lashkar-e-Khalsa group in Punjab
Share Market Opening: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; सेन्सेक्स 72,000 च्या वर, कोणते शेअर्स घसरले?

त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गांधीनगरला गेले. या ठिकाणी दहशतवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय, विश्व हिंदू परिषदेच कार्यालय, हायकोर्ट, जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, भाजप कार्यालयाला देखील भेट दिली. तसेच या स्थळांची त्यांनी फोटोग्राफी, व्हिडिओ देखील काढले. यासाठी त्यांनी या ठिकाणी भाड्यानं गाडी देखील घेतली होती, असाही खुलासा शाहनवाज या दहशतवाद्यानं केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.