ISKCON Viral Video: पाटण्याच्या इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीनिमित्त गर्दी, भाविकांवर पोलिसांना लाठीमार; पहा व्हिडिओ

ISCON Temple Viral Video: गेल्या वर्षीही पाटणा येथील इस्कॉन मंदिरात लाखो भाविकांची गर्दी झाली होती. जन्माष्टमीचा सण विशेषतः इस्कॉन मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
ISCON Temple Viral Video
ISCON Temple Viral VideoEsakal
Updated on

जन्माष्टमीनिमित्त देशातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. पाटण्यातील इस्कॉन मंदिरात गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जगभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये जन्माष्टमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक लांबून येतात. पाटण्यातील इस्कॉन मंदिर हे बिहारमधील इस्कॉन समुदायाचे सर्वात मोठे मंदिर आहे. जन्माष्टमीच्या दिवशी लाखो भाविक येथे जमल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

या प्रकरणी बोलताना पाटणा शहराचे एसपी म्हणाले की, "दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. मंदिराच्या गेटवर जमाव नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी सुव्यवस्था राखण्यासाठी लाठीचार्ज केला."

दरम्यान पोलिसांच्या या लाठीमारात कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. काही काळ मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होता, परिस्थिती नियंत्रणात येताच पुन्हा भाविकांचा प्रवेश सुरू करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ISCON Temple Viral Video
Trending : ‘आधी गरमागरम जिलेबी आणून दे, मग तुझ्या तक्रारीच बघू’ पोलिसांची तरूणाकडे मागणी!

गेल्या वर्षीही पाटणा येथील इस्कॉन मंदिरात लाखो भाविकांची गर्दी झाली होती. जन्माष्टमीचा सण विशेषतः इस्कॉन मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

जगभरात जिथे इस्कॉन मंदिरे आहेत तिथे श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यासाठी भक्त दरवर्षी उत्साहाने जमतात. दिल्ली, वाराणसी, मथुरा, बेंगळुरू यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील इस्कॉन मंदिरांमध्ये जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

ISCON Temple Viral Video
Viral Video: 'जमीन विकून आयफेल टॉवरसमोर रील बनवण्यासाठी गेला'; नेटकरी म्हणतात भावाला आवरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.