Israel-Hamas War: इस्राइल सैन्याने आपल्याच तीन नागरिकांची केली हत्या; हमासने ठेवले होते ओलीस

Israel-Hamas War
Israel-Hamas War
Updated on

Israel-Hamas War: इस्राइल-हमास युद्धाचा आज ७१ वा दिवस आहे. इस्राइल सैन्याने उत्तर गाझामधील हमास दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र यावेळी त्यांच्याकडून मोठी चूक झाली आहे. इस्राइलने आपल्याच तीन सैनिकांना गोळ्या घातल्या. यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा आढावा घेतला जात असल्याची माहिती इस्राइल लष्कर प्रवक्त्याने दिली आहे.

गाझामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या लढाईदरम्यान ओलीस मारले गेल्याचे सांगत इस्रायली लष्कराने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लष्कराने याप्रकरणी शोक व्यक्त केला आहे आणि पीडितांच्या कुटुंबियांना पारदर्शकता चौकशीचे आश्वासन दिले आहे. (Latest Marathi News)

लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की गाझामधील तीव्र लढाई दरम्यान तीन इस्राइली ओलीसांना धोका म्हणून ओळखले गेले, परिणामी सैन्याने गोळीबार केला आणि तिन्ही ओलीस ठार झाले.

Israel-Hamas War
NAMCO Bank Election: शरद पवार गट राहिला बाजूला; राष्ट्रवादी वगळता सर्वपक्षीय उमेदवार रिंगणात

28 वर्षीय योथम हैम, 25 वर्षीय समीर अल तलल्का आणि 26 वर्षीय अॅलोन शमरीझ अशी मृत ओलीसांची नावे आहेत. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांनी या सर्वांचे किबुत्झ केफार येथून अपहरण केले होते.

ओलिसांच्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कौटुंबिक मंच ऑफ होस्टेज अँड मिसिंग पर्सन्सने देखील ठार झालेल्या तीन ओलिसांच्या नावांची पुष्टी केली आणि शोक व्यक्त केला.

Israel-Hamas War
Ratan Tata: रतन टाटांची सुरक्षा वाढवा नाहीतर त्यांचा सायरस मिस्त्री होईल; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.