Video: मोदींचा इस्राइलला तर वाजपेयींचा होता पॅलेस्टाईनला पाठिंबा! माजी पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल

Viral video: वाजपेयींनी एका सभेला संबोधित करताना इस्राइलनं पॅलेस्टाईनच्या जमिनीवरील ताबा सोडवा अशी भूमिका मांडली होती.
Atal Bihari Vajpayee
Atal Bihari Vajpayee
Updated on

नवी दिल्ली : इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक वर्षांपासूनचा असलेला वाद सोमवारी पुन्हा उफाळून आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये इस्रायलला पाठिंबा जाहीर केला आहे. इस्राइलचे पंतप्रधान नेत्यानाहू आणि PM मोदी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.

पण दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी यापूर्वी अशाच एका संघर्षावेळी पॅलेस्टाईनला पाठिंबा जाहीर केला होता. त्यांच्या या घोषणेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Israel Palestine Hamas War Modi support for Israel Vajpayee support for Palestine video goes viral)

Atal Bihari Vajpayee
Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाला वाराणसीतून अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

भाजपच्या सभेतील व्हिडिओ व्हायरल

दिल्लीत सन १९७७ रोजी भाजपच्या एका सभेला संबोधित करतानाचा अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यावेळी वाजपेयी हे जनता पार्टीच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते. व्यासपीठावरुन भाषण करताना वाजपेयी म्हणतात, जनता पार्टीचं सरकार सत्तेत आलं आहे त्यामुळं हे सरकार अरबांना साथ देणार नाही तर इस्राइलला साथ देईल, असं सध्या बोललं जात आहे. (Latest Marathi News)

मोरारजी भाईंनी हे यापूर्वीच स्पष्ट केलंय, पण गैरसमज दूर करण्यासाठी मी पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही प्रत्येक प्रश्न हा मेरिटच्या हिशोबानं पाहू. पण मध्य पूर्व आशियाबाबतची ही स्थिती स्पष्ट आहे की, ज्या जमिनीवर इस्रायलनं कब्जा केला आहे ती जमीन त्यांना रिकामी करावी लागेल. आक्रमणकारी आक्रमणांचे परिणाम भोगावेत. आम्हाला हे आमच्या संदर्भात स्विकारार्ह नाही. त्यामुळं जो नियम आम्हाला लागू आहे तो इतरांवरही लागू होईल. (Marathi Tajya Batmya)

Atal Bihari Vajpayee
ShivSena Dasara Melava: ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! शिंदे अर्ज घेणार मागे

अरबांची जमीन मोकळी व्हायला पाहिजे, जे पॅलेस्टिनी आहेत ते पॅलेस्टिनी आहेत त्यांना त्यांचे योग्य अधिकार मिळायला हवेत. इस्राइलचं अस्तित्व तर सोव्हियत रशिया आणि अमेरिकेनंही मान्य केलंय तर आम्हीही मान्य केलं आहे. मध्य-पूर्ववर तणावावर एक असा तोडगा काढायला हवा, ज्यामध्ये आक्रमणालाविरोध आणि कायमची शांतता प्रस्थापित झाली पाहिजे.

तर दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन आजच्या परिस्थितीवर भाष्य करताना इस्राइलला पाठिंबा दर्शवला. त्यांनी म्हटलं की, इस्राइलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला यावरुन आम्हाला धक्का बसला आहे. आम्हाला निरपराध लोकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती काळजी आहे. त्यामुळं या कठीण काळात आम्ही इस्राइलसोबत आहोत. पंतप्रधानांचं हे संदेश देणारं ट्विट एस. जयशंकर यांनी रिट्विट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.