Chandrayaan 3: ISRO प्रमुखांनी केवळ तीन शब्दांत दिली PM मोदींना पहिली खबर; म्हणाले...

चांद्रयान ३ नं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानं भारतासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला आहे.
Chandrayaan 3: ISRO प्रमुखांनी केवळ तीन शब्दांत दिली PM मोदींना पहिली खबर; म्हणाले...
Updated on

बंगळुरु : चांद्रयान ३ नं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानं भारतासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला आहे. या ऐतिहासिक क्षणाची माहिती इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरुन दिली. "भारत चंद्रावर पोहोचला" अशा मोजक्याच शब्दांत त्यांनी मोदींना आपण यशस्वी ठरल्याचं सांगितलं. (ISRO chief S Somnath congratulates his team on the success of the Chandrayaan-3 mission)

बंगळुरुच्या इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून भारताचे सर्व वैज्ञानिक चांद्रयानाच्या चंद्रावर उतरण्याचा सोहळा पाहत होते. अखेर विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पाऊल ठेवल्यानंतर इस्त्रोच्या कमांड सेंटरमध्ये शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला.

यावेळी दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं ब्रिक्स समिटसाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना एस. सोमनाथ यांनी फोन केला आणि चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्याची खबर दिली. (Latest Marathi News)

Chandrayaan 3: ISRO प्रमुखांनी केवळ तीन शब्दांत दिली PM मोदींना पहिली खबर; म्हणाले...
Chandrayaan 3: मोहिम फत्ते! चांद्रयान-३ नं रचला इतिहास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत बनला पहिला देश

"भारत चंद्रावर पोहोचला" या तीन शब्दांतच त्यांनी पंतप्रधान मोदींना मोहिम फत्ते झाल्याची पहिली खबर दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आणि भारतासाठी हा मोठा गौरवाचा क्षण असल्याचं म्हटलं. त्यानंतर एस सोमनाथ यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचं आणि देशवासियांचं अभिनंदन केलं. (Latest Marathi News)

Chandrayaan 3: ISRO प्रमुखांनी केवळ तीन शब्दांत दिली PM मोदींना पहिली खबर; म्हणाले...
Kailash Kher Song : "....कदमों मे तेरे हो शिखर!"; चांद्रयानानिमित्त कैलाश खेरचं खास गाणं; भारतीयांना केलं समर्पित

सी. सोमनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार ते या मोहिमेच्या यशस्वीत्वेच्या प्रवासाचे भाग राहिले. तसेच चांद्रयान ३ प्रकल्पाच्या मागे ज्यांची मेहनत होती ते प्रकल्प संचालक पी विरामुथुवेल यांच्यासह इतर सर्व जबाबदाऱ्या सोपवलेल्या वैज्ञानिकांचे त्यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.