मोबाईलपासून ते टिव्हीच्या सिग्नल्सचा दर्जा सुधारणारे सॅटेलाईट होणार लाँच

sattelite
sattelite
Updated on

नवी दिल्ली : आपल्या मोबाईल फोनपासून ते टीव्हीच्या सिग्नल्सपर्यंतच्या सर्व गोष्टींचा दर्जा सुधारणाऱ्या कम्यूनिकेशन सॅटेलाईट सीएमएस-01 आज बुधवारी लाँच होणार आहे. याबाबतची माहिती इस्रोने दिली आहे. सॅटेलाईट पीएसएलव्ही-सी 50 रॉकेटमध्ये स्थापित केल्यानंतर 25 तासांचा मोठा काऊंटडाऊन सुरु करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजून 41 मिनिटांनी हे सॅटेलाईट चेन्नईपासून 120 किमी दूर श्रीहरीकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरुन पाठवले जाईल. मात्र, आजचे हे सॅटेलाईटचे लाँचिंग हवामानावर देखील अवलंबून आहे.

इस्रोने म्हटलं की, पीएसएलव्ही-सीएमएस-01 मिशनचे काऊंटडाऊन बुधवारी दुपारी 2:41 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्रामध्ये सुरु झाले. हे पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकलचे 52 वे मिशन आहे. सीएमएस-01 (आधीचे नाव जीसॅट-12 आर) इस्रोचे 42 वे कम्यूनिकेशन सॅटेलाईट आहे. हे सॅटेलाईट कम्यूनिकेशन सॅटेलाईट फ्रिक्वेंसी स्पेक्ट्रमचे एक्सटेंडेड सी बँडमध्ये सेवा उपलब्ध करुन देईल. या सॅटेलाईटच्या कार्यक्षेत्रात भारताची मुख्य भूमी, अंदमान निकोबार आणि लक्षदीप द्वीपसमूह असणार आहेत. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन केंद्रातून लाँच होणारे हे 77 वे लाँच व्हेईकल मिशन असेल.

पीएसएलव्ही-सी 50 मिशनमुळे कम्यूनिकेशन सेवांमध्ये खासकरुन सुधारणा होणार आहे. या मदतीने टिव्ही चॅनेल्सच्या पिक्चरची गुणवत्ता सुधारण्यासोबतच सरकारला टेली-एज्यूकेशन, टेली-मेडीसीनला पुढे नेण्याबरोबरच आपत्ती नियोजनामध्येही मदत प्राप्त होईल. हे सॅटेलाईट 2011 मध्ये लाँच केल्या गेलेल्या जीसॅट-2 टेलीकम्यूनिकेशन सॅटेलाईटची जागा घेईल.

सीएमएस-01 पुढच्या सात वर्षांपर्यंत देईल सेवा
हे पीएसएलव्हीच्या एक्सएल कॉन्फीगरेशनमधले 22 वे उड्डान असेल. यावर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे मागच्या महिन्यात लाँच केल्या गेलेल्या इस्रोच्या पहिल्या मिशननंतर होणारे  हे दुसरे अभियान आहे. सीएमएस-01 ला पृथ्वीच्या कक्षेत सर्वांत उंच ठिकाणी म्हणजेच 42,164 किमी वर स्थापित करण्यात येणार आहे. हे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित झाल्यानंतर पृथ्वीच्या चारी बाजूला त्याच्या गतीने फिरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.