श्रीहरीकोटा - GISAT-1 उपग्रहाचे प्रक्षेपण फसले आहे. आकाशातील भारताचे नेत्र म्हणून GISAT-1 कडे पाहिले जात होते. नियोजनानुसार आज पहाटे ५.४३ च्या सुमारास GSLV रॉकेटमधुन GISAT-1 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. GSLV-F10 EOS-03 मिशनकडून भरपूर अपेक्षा होत्या. GISAT-1 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह होता.
ठरल्याप्रमाणे आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण झाले. पहिल्या दोन स्टेजमध्ये रॉकेटने व्यवस्थित काम केले, असे मिशन कंट्रोल सेंटरकडून सांगण्यात आले. पण तिसऱ्या स्टेजमध्ये गडबड झाली. नासा स्पेस फ्लाइट डॉट कॉमच्या ख्रिस बर्गिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या स्टेजमध्ये मिशन फेल झाले.
स्वातंत्र्यदिनाच्या तीन दिवस आधी होणाऱ्या या उपग्रह प्रेक्षपणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. इस्रोसाठी हा एक मोठा झटका आहे. कालंच GSLV-F10 EOS-03 मिशनसाठी काऊंटडाऊन सुरु झालं होत.
मिशन फेल झाल्यावर इस्रोकडून काय सांगण्यात आले?
ठरल्याप्रमाणे आज ५.४३ च्या सुमारास आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन GSLV-F10 प्रक्षेपण झाले. पहिल्या दोन स्टेजमध्ये रॉकेटची कामगिरी सामान्य होती. पण तिसरी क्रायोजेनिक अप्पर स्टेज प्रज्वलित होऊ शकली नाही. काही तांत्रिक कारणे यामागे आहेत, असे इस्रोकडून सांगण्यात आले.
काय होते GISAT-1 चे फायदे?
या उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती मिळेल. त्यादृष्टीने झटपट पावलं उचलता येतील, असं इस्रोमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. शेती, जंगल, खनिजशास्त्र, बर्फ, ग्लेशिअर आणि महासागरविज्ञान यामध्येही यामध्येही GISAT-1 ची मदत होणार आहे. GISAT-1 EOS-03 हा २,२६८ किलो वजनी उपग्रह आहे. जीएसएलव्ही रॉकेमधून हा उपग्रह जीटीओ कक्षेत स्थापित करण्यात येणार होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.