इस्रो उद्या लॉंच करणार PSLV-C52; प्रक्षेपण Live कसे पाहावे? वाचा

isro satellite launch on February 14 know how to watch pslv c52 launch live timings and its importance
isro satellite launch on February 14 know how to watch pslv c52 launch live timings and its importance
Updated on

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) म्हणजेच इस्रो ही 2022 मध्ये पहिल्या अंतराळ प्रक्षेपणासाठी सज्ज झाली आहे. एस सोमनाथ (S Somanath) यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली अंतराळ मोहीम देखील असणार आहे, ज्यांनी अलीकडेच के सिवन या नावाने प्रसिद्ध असलेल्या कैलासवादिवू सिवन (Kailasavadivoo Sivan) यांच्याकडून 14 जानेवारी 2022 रोजी सूत्रे हाती घेतली आहेत. (how to watch pslv c52 launch live timings and its importance)

ISRO ने जाहीर केले आहे की ते ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन, PSLV-C52 हे 14 फेब्रुवारी, 2022 रोजी प्रक्षेपित करणार आहे. प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथील पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून पहाटे 5.59 AM वाजता होणार आहे. यासाठी ISRO ने आधीच 25 तास आणि 30 मिनिटांची उलट मोजणी (Countdown) प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रक्षेपण लाइव्ह कसे पहावे

ISRO ने जाहीर केले आहे की, ते PSLV-C52/EOS-04 प्रक्षेपण मिशनचे 14 फेब्रुवारी 2022 रोजी 'इस्रो ऑफिशियल' (ISRO Official) नावाच्या इस्रोच्या अधिकृत YouTube पेजवर लाईव्ह करण्यात येणार आहे. PSLV-C52/EOS-04 प्रक्षेपण मोहीम 14 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 5.30AM IST पासून लाईव्ह केली जाईल.

व्हिडिओ लाईव्ह येथे पाहा : PSLV-C52/EOS-04 लाँच

isro satellite launch on February 14 know how to watch pslv c52 launch live timings and its importance
देशातील बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर 236 किमी पर्यंत धावतात

याचे महत्व काय आहे?

EOS-04 : इस्रोने सांगितले की EOS-04 हा रडार इमेजिंग उपग्रह आहे. याचा उपयोग पृथ्वीची उच्च दर्जाची छायाचित्रे घेण्यासाठी केला जाईल. यामुळे शेती, वनीकरण, वृक्षारोपण, जमिनीतील ओलावा, पाण्याची उपलब्धता आणि पूरप्रवण क्षेत्रांचे नकाशे तयार करण्यात मदत होईल.

INSPIREsat-1 आणि INS-2TD हे दोन्ही लहान उपग्रह ही एकत्र पाठवले जाणार आहेत जाणार आहेत. INSPIREsat-1 हा उपग्रह भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने (IIST) कोलोरॅडो विद्यापीठाच्या स्पेस फिजिक्स आणि अॅटमॉस्फेरिक प्रयोगशाळेच्या सहकार्याने विकसित केला आहे. INS-2TDहा एकाच वेळी प्रक्षेपित होणारा इस्रोचा हा दुसरा उपग्रह आहे. भारत आणि भूतानचा संयुक्त उपग्रह INS-2V याच्या आधी तो विकसित करून पाठवला जात आहे. INS-2V च्या प्रक्षेपणासाठी महत्त्वाचा आहे.

isro satellite launch on February 14 know how to watch pslv c52 launch live timings and its importance
देशात 'दोन अपत्ये' धोरणासाठी कायदा करा; भाजप नेत्याची लोकसभेत मागणी

INSAT-4B हा देशाचा 21 वा डि-कमिशन केलेला उपग्रह असणार आहे. दरम्यान, ISRO ने सांगितले की INSAT-4B 24 जानेवारी रोजी डी-कमीशन करण्यात आला आहे आणि पोस्ट मिशन डिस्पोजल (PMD) साठी पाठवला गेला आहे. पीएमडी पाठवणे म्हणजे उपग्रहाने आपला वेळ पूर्ण केला आहे आणि आता त्याची विल्हेवाट लावली जात आहे. इस्रो PMD करत असलेला हा 21 वा उपग्रह आहे. 11 मार्च 2007 रोजी हे 1,335 किलो वजनाचे इनसॅट-4बी अंतराळात 12 वर्षे काम करण्यासाठी पाठवण्यात आला होता. युनायटेड नेशन्स स्पेस डेब्रिज कंट्रोल गाइडलाइन्स अंतर्गत, ते विल्हेवाटीसाठी 340 किमी उंचीवर असलेल्या 'ग्रेव्हयार्ड-ऑर्बिट' या कक्षेत पाठवला गेला आहे.

isro satellite launch on February 14 know how to watch pslv c52 launch live timings and its importance
प्रेमप्रकरणातून तरुणीने युवकास जिंवत जाळले, नाशिक जिल्ह्यात खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()