ISRO Scientist Honey Trap Case : इस्रोचा शास्त्रज्ञ हनीट्रॅपच्या विळख्यात; वाचा काय आहे प्रकरण

गुप्तचर संस्था आपल्या शत्रू देशाची माहिती मिळवण्यासाठी हनीट्रॅपचा शस्त्र म्हणून वापर करतात.
ISRO Scientist Honey Trap Case
ISRO Scientist Honey Trap Casesakal
Updated on

इस्रायलची मोसाद असो वा रशियाची केजीबी, अमेरिकन सीआयए असो की भारतीय रॉ, या सर्व गुप्तचर संस्था आपल्या शत्रू देशाची माहिती मिळवण्यासाठी हनीट्रॅपचा शस्त्र म्हणून वापर करतात.

प्रवीण मौर्य, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये काम करणारे रॉकेट वैज्ञानिक यांनी LinkedIn वर लिहिले – त्याला हनी ट्रॅप केले जात आहे आणि गुप्तचर माहिती सांगण्यास भाग पाडले जात आहे. त्याने तसे करण्यास नकार दिल्यावर गुप्तहेरांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

या शास्त्रज्ञाने इस्रो आणि केरळ पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांवर कट रचल्याचा आणि या हनीट्रॅपमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला आहे. मात्र, इस्रो या प्रकरणाची चौकशी करत असून प्रवीणला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

प्रवीण म्हणतो की, अजीकुमार सुरेंद्रन नावाच्या व्यक्तीने त्याला दुबईत राहणाऱ्या काही लोकांसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्यास सांगितले. तसेच अजीकुमारने प्रवीणला इस्रोकडून काही गोपनीय माहिती देण्याच्या बदल्यात मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. प्रवीणने तसे करण्यास नकार दिल्यावर आजीकुमारने त्याच्या मुलीच्या मदतीने त्याला हनीट्रॅप केले. यानंतर आजीकुमार याने केरळमध्ये POCSO कायद्यांतर्गत प्रवीणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे अंतिम तपास अहवाल आल्यानंतरच कळेल.

ISRO Scientist Honey Trap Case
Canada Permanent Residents : 'ही' 16 कामे करणाऱ्यांना मिळणार कॅनडाचे नागरिकत्व

1980 मध्ये भारतात हनीट्रॅपचे प्रकरण उघडकीस आल्याने केंद्र सरकार अस्वस्थ झाले होते. खरं तर, के.व्ही उन्नीकृष्णन, देशाच्या गुप्तचर संस्था RAW साठी काम करत होते, त्यांना 1980 च्या दशकात एका महिलेने हनी ट्रॅप केले होते.

नंतर कळले की, ही महिला अमेरिकन गुप्तचर संस्था CIA म्हणजेच सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीची सदस्य आहे. उन्नीकृष्णन जेव्हा RAW चे चेन्नई विभागाचे प्रमुख होते तेव्हा ती एका एअरलाइनमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती.

उन्नीकृष्णन लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच एलटीटीईसोबत काम करत होते. महिलेच्या हातून गुप्तचर माहिती दुसऱ्या सरकारला देत असल्याचे सुरक्षा एजन्सीला समजताच त्याला अटक करण्यात आली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील शांतता करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वीच त्याला अटक झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()