भारताची महत्वकांक्षी चंद्र मोहिम चांद्रयान-३ यशस्वी झाली, मात्र या मिशनमध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या वैज्ञानिक वलरमथी यांचं नुकतेच निधन झाल्याची माहिती समोर आली आहे . भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) वैज्ञानिक वलरमथी यांच्याच आवाजात आपण चांद्रयान प्रक्षेपणावेळी शेवटचे काउंटडाउन ऐकले होते. मात्र आता त्या काउंटडाऊनमागचा आवाज कायमचा हरवला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार वलारमथी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रिपोर्टनुसार तमिळनाडूतील अरियालुर येथे वलारमथी यांचं शनिवारी संध्याकाळी निधन झालं. त्यांनी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड झालेले चांद्रयान ३ आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोट्टा येथून १४ जुलै रोजी यशस्वीरित्या लाँच करण्यात आलं होतं. देशाची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाच्या वेळी शेवटची उलटी गिनती त्यांच्या आवाजात होती. मात्र वलरमथी यांचं हे शेवटचं काउंटडाऊन ठरलं.
वलरमथी यांच्या निधनाबद्दल इस्त्रओचे वैज्ञानिक डॉक्टर पीव्ही वेंकटकृष्ण यांनी दुखः व्यक्त केलं आहे. त्यांनी श्रीहरीकोट्टा येथे इस्त्रोच्या भविष्यातील मिशन्सची उलटी गिनतीसाठी वलारमधी मॅडम यांचा आवाज ऐकू येणार नाही. चांद्रयान ३ त्यांचं शेवटचं काउंटडाउन होतं. इतकेच नाही तर सोशल मीडियावर देखील त्यांनी मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहिली जात आहे.
चांद्रयान-३ चे प्रज्ञान रोव्हर निष्क्रिय
चांद्रयान-३ चे प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं काम पूर्ण केलं आहे आणि ते आता निष्क्रिय (स्लीप मोड) अवस्थेत गेलं आहे. इस्त्रोने शनिवारी याबद्दलची माहिती दिली होती. यापूर्वी इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-३ बद्दल माहिती देताना रोव्हर आणि लँडर व्यवस्थत काम करत असल्याचे सांगितले होते. चंद्रावर सध्या रात्र असल्याने रोव्हर स्लीप मोडमध्ये गेल्याचे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.