Moon View By Chandrayaan 3 : विलक्षण! चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला VIDEO , तुम्हीही पाहा हे अप्रतिम दृश्य

चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. अंतराळयानात बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे हे चित्र रेकॉर्ड करण्यात आले.
Moon View By Chandrayaan 3 : विलक्षण! चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला VIDEO , तुम्हीही पाहा हे अप्रतिम दृश्य
Updated on

Chandrayan -3:चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. अंतराळयानात बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे हे चित्र रेकॉर्ड करण्यात आले. चांद्रयान 3 शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहोचले. यादरम्यान चंद्राजवळ प्रदक्षिणा घालताना अंतराळ यानात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने चंद्राचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये चमकदार चंद्र दिसू शकतो. व्हिडीओमध्ये स्पेसक्राफ्टमध्ये बसवलेले सोलर पॅनल्सही दिसत आहेत. इस्रोने ट्विटरवर चंद्राची ही पहिली झलक शेअर केली आहे.

चांद्रयान-3 मिशन 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर यान पृथ्वीच्या पाच फेऱ्या घेऊन चंद्राकडे रवाना झाले. चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश (LOI) पूर्ण केल्यामुळे शनिवार हा मोहिमेसाठी महत्त्वाचा दिवस होता.

इस्रोने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चंद्रावरील पृष्ठभाग स्पष्ट दिसतं आहे. चांद्रयान-३ ही भारताची चंद्राच्या अध्ययानासाठी पाठवलेली तिसरी मोहीम होती. याआधी पाठवलेल्या पहिल्या मोहीमेत भारताला यश आलं होतं, तर दुसऱ्या चांद्रयान मोहीमेच अंतिम टप्प्यात विक्रम लॅंडरचा अपघात झाल्याने ही मोहीम अंशत: अपयशी झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.