ISRO Satellite Launch : इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी! सिंगापूरच्या सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

'डीएस-एसएआर' या उपग्रहासह अन्य सहा उपग्रहांना इस्रोच्या PSLV-C56 रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले.
ISRO Satellite Launch
ISRO Satellite LauncheSakal
Updated on

भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. सिंगापूरच्या 'डीएस-एसएआर' या उपग्रहासह अन्य सहा उपग्रहांना इस्रोच्या PSLV-C56 रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले. आज सकाळी सहा वाजता पीएसएलव्हीने उड्डाण घेतलं. यानंतर अवघ्या 25 मिनिटांमध्ये सर्व उपग्रहांना त्यांच्या कक्षेत पोहोचवण्यात आलं.

श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या पहिल्या लाँच पॅडवरुन हे प्रक्षेपण पार पडलं. ही एक पूर्णपणे व्यावसायिक मोहीम आहे. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड ही या मोहिमेचे संचालन करत आहे. ही संस्था अवकाश मंत्रालयाच्या अंतर्गत येते. (ISRO Satellite Mission)

डीएस-एसएआर

या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा उपग्रह हा सिंगापूरचा 'DS-SAR' हा आहे. सिंगापूर सरकारच्या डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सी आणि सिंगापूरमधील एसटी इंजिनिअरिंग यांनी संयुक्तपणे हा उपग्रह विकसित केला आहे. सिंगापूर सरकारमधील संस्थांना आणि ST इंजिनिअरिंग कंपनीला व्यावसायिक वापरासाठी हा उपग्रह फायद्याचा ठरणार आहे. (Singapore Satellites)

ISRO Satellite Launch
Chandrayaan-3 Update : पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं चांद्रयान-3; इस्रोने ट्विट करत दिली माहिती

या उपग्रहामध्ये एक सिंथेटिक अपार्चर रेडारही आहे. या उपकरणाच्या मदतीने हा उपग्रह कोणत्याही हवामानात, किंवा रात्रीदेखील पृथ्वीचा एक मीटर रिझॉल्यूशनचा फोटो घेऊ शकतो.

इतर उपग्रह

यासोबतच अन्य सहा उपग्रहदेखील आज अंतराळात पाठवण्यात आले. हे उपग्रह पुढीलप्रमाणे :

  • व्हेलॉक्स-एएम - हा एक तंत्रज्ञानदर्शक सूक्ष्म उपग्रह आहे. याचं वजन 23 किलो आहे.

  • ॲटमॉस्फेरिक कपलिंग अँड डायनामिक्स एक्स्प्लोरर - हा एक प्रायोगिक उपग्रह आहे.

  • स्कूब-2 - हा एक 3U नॅनो उपग्रह आहे.

  • नूलियन - हा उपग्रह शहरी आणि दुर्गम ठिकाणी अखंड 'आयओटी' कनेक्शन पुरविण्यास सक्षम आहे. हादेखील 3U नॅनो उपग्रह प्रकारात मोडतो.

  • 'क्लासिया-2' आणि 'ओआरबी-12 स्ट्रायडर' - या उपग्रहांची आंतरराष्ट्रीय सहकार्याने निर्मिती करण्यात आली आहे.

ISRO Satellite Launch
Chandrayaan 3 : ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी पडला 'चांद्रयान-३' च्या रॉकेटचा भाग? इस्रोने दिलं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.