नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C53/DS-EO मिशनचे यशस्वी प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण दुसऱ्या लॉन्च पॅडवरून करण्यात आले. या मिशनचे काउंटडाऊन २४ तासांपूर्वी २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू झाले होते. न्यूस्पेस इंडिया लिमिटेडचे (NSIL) हे दुसरे व्यावसायिक प्रक्षेपण आहे. यापूर्वी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) PSLV-C52/EOS-4 मिशन श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले होते. (Isro successfully launches PSLV-C 53 / DS-EO Mission)
दुसऱ्या लाँच पॅडवरून PSLV रॉकेटचे हे १६ वे उड्डाण होते. बेंगळुरू स्थित दिगंतारा रोबस्ट इंजिनिअरिंग प्रोटॉन फ्लूरोसेन्स मीटर (ROBI) प्रोटॉन डोसीमिर पेलोड आणि ध्रुव स्पेस सॅटेलाइट ऑर्बिटल डिप्लॉयर (DSOD 1U) या रॉकेटसह पाठवण्यात आले आहेत. दोघेही स्टार्टअप कंपन्यांचे उपग्रह आहेत. दोघांशिवाय ४४.४ मीटर उंचीच्या PSLV-C53 रॉकेटमध्ये आणखी तीन उपग्रह असतील. हे रॉकेट (Rocket) पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या ५७० किमी वरच्या कक्षेत उपग्रहांना तैनात करेल.
जे तीन मुख्य उपग्रह पाठवले आहेत, त्यापैकी DS-EO उपग्रह आणि NeuSAR हे दोन्ही उपग्रह सिंगापूरचे आहेत. NeuSAR हा SAR पेलोड असलेला सिंगापूरचा पहिला व्यावसायिक उपग्रह आहे. हे उपग्रह कोणत्याही हवामानात रात्रंदिवस फोटो काढण्यास सक्षम आहे.
DS-EO उपग्रहाचे वजन ३६५ किलो आहे. तर NeuSAR हा उपग्रह १५५ किलोंचा आहे. तिसऱ्या उपग्रहाचे नाव स्कूब-1 आहे. हा उपग्रह सिंगापूरच्या (Singapore) नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने बनवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.