अनामत जप्त होण्यासाठी काँग्रेसला जागा सोडायची का?

गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने ७५ जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला केवळ १९ जागा जिंकता आल्या होत्या
lalu prasad yadav
lalu prasad yadavsakal media
Updated on

पाटणा : अनामत रक्कम जप्त होऊ देण्यासाठी काँग्रेसला पोटनिवडणुकीसाठीची जागा सोडू का? असा प्रश्न राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी आज उपस्थित केला. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लालूप्रसाद आज प्रथमच पाटण्याला आले. माध्यमांशी बोलताना त्यांनी बिहारमधील राजकारणावर भाष्य केले.

काँग्रेसबरोबरील युती तुटली आहे. त्यामुळे `महागठबंधनाला` तडे गेले आहेत. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ``काँग्रेसबरोबरील युती म्हणजे काय? आम्ही सर्वकाही पराभूत होण्यासाठी काँग्रेसवर सोडून द्यायचे का? निवडणुकीवेळी अनामत रक्कमही जप्त होऊ द्यायची का?’’

गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने ७५ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ १९ जागा जिंकता आल्या होत्या. बिहारमध्ये आता ३० ऑक्टोबर रोजी कुशेश्‍वरस्थान आणि तारापूर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. कुशेश्वरस्थान या मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याचा निर्णय राष्ट्रीय जनता दलाने घेतला आहे. युतीनुसार हा मतदारसंघ काँग्रेससाठी देण्यात आला होता. राजदने उमेदवार दिल्याने आता काँग्रेसनेही उमेदवार उभा केला. मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी भूमिका राजदच्या नेत्यांनी आतापर्यंत घेतली होती. परंतु, लालूप्रसाद यांनी थेटपणे काँग्रेसवर टीका करून भूमिका स्पष्ट केली.

कुशेश्‍वरस्थान आणि तारापूर विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री पशुपतिकुमार पारस उद्या (सोमवारी) जातील. या दोन्ही ठिकाणी नितीशकुमार यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीद्वारे एकत्रितपणे ही पोटनिवडणूक लढविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.