बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. मोदी-शहांनीही निवडणुकीत माझ्या चेहऱ्याचा वापर केला, आपली 25 वर्षे युतीमध्ये सडली असं म्हणत त्यांनी त्यांनी भाजपला धारेवर धरलं. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे.
नवाब मलिक यांनी मागच्या काळात भाजपवर गंभीर आरोप करत भाजपच्या अनेक नेत्यांवर शाब्दिक हल्ले केले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचं समर्थन करत ते म्हणाले की, भाजपसोबत जे पक्ष गेले ते संपले आहेत. ज्या पक्षांनी भाजपशी युती केली, ते पक्ष हळूहळू नष्ट झाले, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या धर्माचा अभिमान बाळगणे चांगले आहे, परंतु इतर धर्मांबद्दल द्वेष करणे योग्य नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
हिंदूत्वासाठी आपल्याला सत्ता हवी होती. आजचं भाजपचं हिंदूत्व हे सत्तेसाठीचं आहे. त्यांनी हिंदूत्वाचं कातडं पांघरलंय. अनेकदा आपल्यावर टीका होते की, हिंदुत्व नाही सोडलं, मात्र आम्ही दूर जाऊ शकत नाही. आम्ही फक्त भाजपला सोडलं, हिंदूत्व नाही. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, असंही त्यांनी म्हटलंय. अमित शहा आपल्यावर टीका करुन म्हणाले, एकट्याने लढा. आम्ही हे आव्हान स्विकारलं आहे. आव्हान द्यायचं आणि मागे इडीची पीडा लावायची हे शौर्य नाही, असं त्यांनी म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.