तौकीर रझांच्या सूनेचे भाजपला समर्थन; म्हणाली...

मौलाना यांनी नेहमीच तिहेरी तलाकचे समर्थन केले आहे
Tauqeer Razha Khan
Tauqeer Razha KhanTauqeer Razha Khan
Updated on

काँग्रेस समर्थक तौकीर रझा खान (Tauqeer Razha Khan) यांची सून निदा खानने घरात बंड केले आहे. रझा यांची सून निदा खान आता उघडपणे भाजपच्या समर्थनात उतरली आहे. भाजप सरकारमुळेच महिला सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तिहेरी तलाकच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले आहे. गुरुवारी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. (It is because of BJP that women got security)

भाजप (BJP) सरकारने तिहेरी तलाक कायदा आणून मुस्लिम महिलांसाठी मोठे काम केले आहे. कारण, तिहेरी तलाक कायदा हा अतिशय घाणेरडा कायदा आहे. याविरुद्ध कोणीही आम्हाला साथ दिली नाही. आमचे दु:ख फक्त भाजप सरकारला समजले. फक्त भाजप सरकारनेच आम्हाला साथ दिली, असेही निदा खान म्हणाल्या.

Tauqeer Razha Khan
‘किशोरी पेंग्वीनकर ताईंचा चांगलाच भडका उडालाय..!’

मौलाना यांनी नेहमीच तिहेरी तलाकचे समर्थन केले आहे. त्यांना कधीही मुस्लिम महिलांनी पुढे यावे, त्यांना संरक्षण मिळावे असे वाटत नाही. त्यांना नेहमीच महिलांना बेड्यांमध्ये पाहायचे असते, असेही सासरे तौकीर रझा (Tauqeer Razha Khan) यांच्या विरोधात बोलताना निदा खान म्हणल्या.

एकदिवस आधी, तौकीर रझा यांनी बाटला हाऊस चकमक बनावट असल्याचे सांगितले होते. या चकमकीत दहशतवादी मारले गेले नव्हते आणि पोलिसांकडून इन्स्पेक्टर महेश चंद्र शर्मा यांची हत्या पोलिसांनीच केल्याचे म्हटले होते. २००९ मध्ये सरकार स्थापन होताच या चकमकीची प्रथम चौकशी केली जाईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाने दिले होते. परंतु, पक्षाने तसे केले नाही. चकमकीत मारल्या गेलेल्या तरुणांना शहीद दर्जा देण्याची मागणी करून ते म्हणाले की, काँग्रेसला (Congress) मुस्लिमांच्या मनोधैर्याची नाही तर पोलिसांच्या मनोबलाची चिंता आहे, असे तौकीर रझा (Tauqeer Razha Khan) म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.