उत्तराखंड : अन्नपदार्थांमध्ये थुंकणे आणि घाण मिसळल्याच्या घटनांवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि आरोग्य मंत्री डॉ. धनसिंग रावत यांनी कठोर निर्णय घेतला आहे. धामी सरकारने अशी कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करण्याचे आदेश दिले आहेत.
आता उत्तराखंडमध्ये खाद्यपदार्थांवर थुंकणाऱ्यांवर मोठी शिक्षा होणार आहे. पुष्कर सिंह धामी सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे सुरू केली आहेत. त्यानुसार दोषी आढळल्यास 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. अलीकडेच डेहराडून आणि मसुरी येथील हॉटेल्स आणि ढाब्यांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये थुंकण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत सीएम धामी यांनी एफडीए आणि पोलिसांना कडक शिक्षा करण्याबद्दल सूचना दिल्या होत्या.