CoWIN Data Leak: डेटा लीक प्रकरणावर सरकारचं अजब स्पष्टीकरण! म्हटलं, तो डेटा...

कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी दिलेला आपला वैयक्तिक डेटा लीक झाल्याच्या वृत्तानं देशभरात खळबळ उडाली आहे.
cowin
cowinsakal media
Updated on

नवी दिल्ली : कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी दिलेला आपला वैयक्तिक डेटा लीक झाल्याच्या वृत्तानं देशभरात खळबळ उडाली आहे. यामुळं सरकारनं लसीकरणासाठी तयार केलेल्या कोविन अॅपच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पण यावर आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. (It is old data we are still verifying it Ministry of Electronics and Information Technology on Covid data leak issue)

कोविड लसीकरणाच्या डेटा लीक प्रकरणावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालायनं म्हटलं की, "हा जुना डेटा असून आम्ही सध्या या डेटाची खातरजमा करत आहोत. याबाबतचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे"

cowin
Ashadhi Wari 2023 : वारकरी पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेने..., आळंदीत लाठीचार्जसंदर्भात मोठी अपडेट

दरम्यान, सरकारच्या या स्पष्टीकरणानं देखील काही प्रश्न उपस्थित होत आहेत, ते म्हणेज हा जुना डेटा म्हणजे नेमका कोणता डेटा? कोविडच्या लसीकरणासाठी नागरिकांना नाव नोंदणी करणं बंधनकारक होतं. ही नोंदणी करण्यासाठी सरकारनं कोविन नावाचं पोर्टलं तयार केलं होतं. त्यात नागरिकांना नाव, जन्मतारीख, पत्ता, आधार क्रमांक ही माहिती भरावी लागत होती. आता हीच माहिती लीक झाली आहे तर सरकार म्हणतंय तो जुना डेटा नेमका कुठला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Latest Marathi News)

cowin
Raj Thackeray : "ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,..."; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर हा डेटा उपलब्ध असल्याचा दावा मलयाला मनोरमाच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मल्याळम डेलीच्या वृत्तानुसार, लीक झालेल्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांचाही समावेश आहे. कोवीन पोर्टलवर वन टाईम पासवर्ड ओटीपी सुविधाही देण्यात आली होती. पण टेलिग्रामवर हा डेटा कसा लीक झाला? हे अद्याप कळू शकलेलं नाही.

2021 मध्ये, अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतातील लस नोंदणी पोर्टल कोविन हॅक केले गेले होते आणि 150 दशलक्ष लोकांचा डेटाबेस विक्रीसाठी होता. अनेक सायबर सुरक्षा संशोधकांनी हा दावा नाकारला आणि त्यामागील वेबसाइट बनावट असल्याचंही म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.