Longest day : पृथ्वीचा वेग मंदावला, बुधवारी १३ तास १३ मिनिटाचा दिवस; दक्षिणायन सुरू

Earth Longest day
Earth Longest day
Updated on

अमरावती : पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जून रोजी १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे २१ जून रोजी वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो.

Earth Longest day
Mumbai Local Train : लोकलमधून 700 प्रवाशांचा मृत्यू! रेल्वे सुरक्षा आयोगाच्या अहवालात खुलासा

२१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षीणायन सुरू होते. दरवर्षी २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. पृथ्वी अक्षवृत्त साडेतेवीस डिग्रीच्या झुकावाने ११ हजार किलोमीटर प्रति तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते.

यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किलोमीटर लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील जसा मोठा दिवस असतो, तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायन सुरू होते.

पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी-कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामी झाली त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंड कमी झाला आहे. ठरावीक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय घडीत लिप सेकंद अ‍ॅडजेस्ट करावा लागतो.

Earth Longest day
Shivsena 57 Anniversary : प्रसाद खांडेकर शिवसेनेत; म्हणाला, माझ्या बाबानंतर आज मी...

१९७२ मध्ये सर्वात प्रथम लिप सेकंद अ‍ॅडजेस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अ‍ॅण्ड रेफरन्स सिस्टिम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप सेकंद अ‍ॅडजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद अ‍ॅडजेस्ट केला जातो.

सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी २१ जून या उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व या १३ तास १३ मिनिटांच्या सर्वात मोठ्या दिवसाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.