Congress Bank Accounts: काँग्रेसला ITATकडून मोठा धक्का! बँक खात्यांवरील आयकर विभागाच्या कारवाईवरील 'स्टे'ची याचिका फेटाळली

Congress Bank Accounts Latest News : आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने (ITAT) काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला आहे.
ITAT dismisses plea by Congress sought a stay against Income Tax Department proceedings of recovery and freezing of their Bank accounts
ITAT dismisses plea by Congress sought a stay against Income Tax Department proceedings of recovery and freezing of their Bank accounts
Updated on

Congress Bank Accounts Latest News :लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या बँक खात्यांविरोधातील कारवाई थांबविण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका प्राप्तिकर अपिलीय लवादाने आज फेटाळून लावली आहे. काँग्रेसच्यावतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ विवेक तनखा याबाबतच्या आदेशाला पुढील दहा दिवसांसाठी स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती केली होती. पण ती फेटाळून लावण्यात आली. आता या लवादाच्या आदेशाविरोधात काँग्रेस पक्ष दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.

काँग्रेसने १६ फेब्रुवारी रोजी याबाबतची सविस्तर माहिती सादर केली होती. पक्षाने २०१८-१९ या वर्षासाठीचे शुल्क आणि दंडाची रक्कम भरली नसल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने पक्षाच्या विविध बँक खात्यांमधील ११५ कोटी रुपयांची रक्कम गोठविल्याचा दावा करण्यात आला होता. काँग्रेसकडून या शुल्कापोटी २१० कोटी रुपये येणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे हे थकीत शुल्क मागील निवडणूक वर्षाच्या काळातील आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी प्राप्तिकर विभागाने पक्षाच्या तीन खात्यांमधून ६५ कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप केला होता. लवादासमोर याबाबतच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना देखील ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

ITAT dismisses plea by Congress sought a stay against Income Tax Department proceedings of recovery and freezing of their Bank accounts
Tax Exemption Limit on Gratuity: 'ग्रॅच्युइटी'बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता 'इतक्या' रकमेपर्यंत टॅक्स फ्री

हा वित्तीय दहशतवाद

प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईवर काँग्रेसने कडाडून टीका केली असून केंद्रीय तपास संस्थांप्रमाणेच या विभागाची कारवाई देखील राजकीय भावनेने प्रेरित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्षाच्या निवडणूक तयारीवर प्रभाव टाकण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले असून विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप वित्तीय दहशतवादाचा आश्रय घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ITAT dismisses plea by Congress sought a stay against Income Tax Department proceedings of recovery and freezing of their Bank accounts
Women workers in IT sector : ग्रामीण भारतात आयटी क्षेत्रात महिला कामगारांच्या संख्येत वाढ

आम्ही जे धनादेश बँकांकडे पाठवित होतो ते वटत नव्हते. अधिक माहिती घेतली असता युवक काँग्रेसचे खाते गोठविण्यात आल्याची बाब समोर आली होती. काँग्रेसचे अनेक खातीही बंद करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण चार खाती गोठविण्यात आली आहेत. प्राप्तिकर विभागनेच आमचे कोणतेही धनादेश स्वीकारू नका तसेच आमच्या खात्यामध्ये जमा होणारी रक्कम रिकव्हरीसाठी ठेवा असे निर्देश बँकांना दिले आहेत.

- अजय माकन, काँग्रेसचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.