एका बिस्किट कंपनीला त्यांचं एक बिस्किट चक्क एक लाख रुपायांना पडल्याचा प्रकार घडला आहे. कंपनीने बिस्किटांच्या पाकिटावर लिहिलेल्या संख्येपेक्षा कमी बिस्किटे दिल्याने आयटीसीला आता ग्राहकाला तब्बल एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. 'सन फेस्ट मेरी लाईट' या १६ बिस्किटांच्या पॅकमध्ये एक बिस्कीट कमी पॅक करणे कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. आयटीसी लिमिटेडला ग्राहक न्यायालयाने चेन्नईतील एक ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, चेन्नईतील एमएमडीए माथुरचे पी दिल्लीबाबू यांनी डिसेंबर २०२१ मध्ये भटक्या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी मनालीतील एका रिटेल दुकानातून "सन फेस्ट मारी लाइट" बिस्किटांची दोन डझन पाकिटे खरेदी केली. मात्र त्यांनी पाकीटे उघडली असता त्यांना त्यामध्ये केवळ १५ बिस्किटे आढळून आली. रॅपरवर १६ बिस्किटे असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. दिल्लीबाबूंनी याबाबत स्टोअर तसेच आयटीसीशी संपर्क साधला असता त्यांना याबद्दल योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
प्रत्येक बिस्किटाची किंमत ७५ पैसे असल्याचे सांगून त्यांनी आपल्या तक्रारीत, आयटीसी लिमिटेड दिवसाला सुमारे ५० लाख पाकिटे बनवते आणि याचा हिशोब केला तर कंपनीने दररोज २९ लाखांपेक्षा जास्त रुपयांची लोकांची फसवणूक केल्याचे म्हटले.
कंपनीचे म्हणणे काय?
या तक्रारीला उत्तर देताना या प्रोडक्टची विक्री बिस्किटांच्या संख्येच्या आधारे नव्हे, तर वजनाच्या आधारे करण्यात आल्याचा युक्तिवाद कंपनीने आपल्या उत्तरात केला. जाहिरात केलेल्या बिस्किटाच्या पाकिटाचे निव्वळ वजन ७६ ग्रॅम होते. मात्र, आयोगाने त्याची तपासणी केली असता पॅक न करता बिस्किटांच्या पाकिटांचे (१५ बिस्किटे असलेले) वजन केवळ ७४ ग्रॅम असल्याचे आढळून आले.
आयटीसीच्या वकिलांनी सांगितले की, २०११ च्या लीगल मेट्रोलॉजी नियमांनुसार प्री-पॅकेज्ड वस्तूंच्या बाबतीत जास्तीत जास्त ४.५ ग्रॅम इतकी तुट ग्राह्य धरली जाते. हा युक्तिवाद देखील मान्य करण्यात आला नाही आणि अशा सवलती केवळ अस्थिर स्वरूपाच्या उत्पादनांनाच लागू होतात, असे स्पष्ट केलं. बिस्किटांसारख्या वस्तूंना हे लागू नाही, ज्यांचे वजन कालांतराने कमी होऊ शकत नाही असेही स्पष्ट करण्यात आलं.
ग्राहक न्यायलायाने कंपनीचा दुसरा युक्तीवाद देखील पेटळाला, ज्यामध्ये प्रॉडक्ट संख्या नव्हे तर वजनाच्या आधारावर विकले गेले होते असा दावा करण्यात आला होता. कारण रॅपरवर बिस्किटांच्या संख्येचा उल्लेख करण्यात आला होता. २९ ऑगस्ट ग्राहक न्यायालयाने आयटीसीला दिल्ली बाबू यांनी नुकसान भरपाई म्हणून १ लाख रुपये देण्याचा तसेच बिल्किटांचे स्पेशन एडिशनची विक्री बंद करण्याचे देखील आगेश दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.