नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांतील हिंसाचाराच्या (Hanuman Jayanti Violence) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी देशवासियांना पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून काँग्रेसच्या (Congress) भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींची आठवण देखील नड्डा यांनी करून दिली आहे.
राजस्थानच्या करौली येथील हिंसाचारावर काँग्रेस शांत का आहे? असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींची आठवण त्यांनी करून दिली. बंगाल आणि केरळचा उल्लेख करत जेपी नड्डा म्हणाले की, तिथे भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. महाराष्ट्रात दोन कॅबिनेट मंत्री तुरुंगात आहेत. यावर काँग्रेस गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
व्होट बँकेच्या राजकारणासाठी अनेक दशकांपासून समाजकंटकांशी तडजोडी केल्या जात आहेत. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांचे डोळे उघडले आहेत. भारतातील तरुणांना विकास हवा आहे, विनाश नाही. एवढी दशके देशावर सत्ता गाजवणारे पक्ष आता इतिहासाच्या पानांमध्ये का मर्यादित आहेत, याचे विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असंही जे. पी. नड्डा म्हणाले.
भारताला पुढे नेण्यासाठी अनेक योजना करण्याचे आवाहन जे. पी. नड्डा यांनी देशवासियांना केले आहे. येत्या २०४७ मध्ये आपण स्वातंत्र्यांची १०० वर्ष पूर्ण करू तेव्हा देश असेल? असे ते म्हणाले. तसेच जे. पी. नड्डा यांनी राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत देशातील तरुणांच्या सक्रीय योगदानाची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.