Jack Dorsey: जॅक डॉर्सी काँग्रेसच्या 'टूलकीट'चा भाग! भाजप आयटीसेलच्या प्रमुखांचा आरोप

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी नुकतेच मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते.
Jack Dorsey_Rahul Gandhi
Jack Dorsey_Rahul Gandhi
Updated on

नवी दिल्ली : ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी नुकतेच मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. यामध्ये शेतकरी आंदोलनावेळी सरकारनं ट्विटर बंद करण्याची तसेच आमच्या कार्यालयांवर छापेमारी करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप केला होता. याला उत्तर देताना भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी प्रतिक्रिया देताना डॉर्सी हे काँग्रेसच्या टूलकीटचा भाग असल्याचं म्हटलं आहे. (Jack Dorsey Part of Congress Toolkit allegation of head of BJP IT CELL Amit Malviya)

मालवीय म्हणाले, "जॅक डॉर्सी यांनी हाच आरोप अमेरिकेवर देखील केला होता. तसेच त्या प्रत्येक देशावर केला जिथं ट्विटर आपली मोहिम चालवतं होतं. जेव्हा डॉर्सी हे ट्विटरचे सीईओ होते तेव्हा ट्विटर आपली मनमानी करु पाहत होतं. हे सत्य आहे की ट्विटर दोन वर्षे भारतातील कायद्याचे पालन करत नव्हते. पण जेव्हा त्यांच्यावर दबाव आला तेव्हा त्यांना आपल्या देशाचे कायदे मानावे लागले" (Latest Marathi News)

Jack Dorsey_Rahul Gandhi
Maharashtra Ministers: पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या बातम्यांवर देसाई भडकले; मीडियाला दिलं जाहीर आव्हान!

डॉर्सी हे काँग्रेसचं टुलकीट

काँग्रेसचा हेतू देशाबाहेर जे भारताविरोधात आवाज उठवतात त्याचा भारताशी संबंध जोडतात. त्यामुळं हा प्रश्न उपस्थित होतो की, राहुल गांधी परदेशात जातात आणि तिथं अशा संघटनांना भेटी देतात ज्या भारताच्याविरोधात आहेत. राहुल गांधी अशा काही लोकांना परदेशात भेटतात त्यांच्या बैठकांचा खुलासा आजपर्यंत होऊ शकलेला नाही. त्यानंतर लगेचच जॅक डॉर्सी अशा प्रकारचं विधान करतात. याचा अर्थ डॉर्सी हे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या टूलकीटचा भाग आहेत. म्हणजेच काँग्रेस अशा प्रकारच्या ताकदींचा वापर करत भारतातील लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारला हटवण्याचं काम करत आहेत, असा आरोपही यावेळी डॉर्सी यांनी केला. (Marathi Tajya Batmya)

खरंतर काँग्रेसवर प्रश्न उपस्थित होतो

दरम्यान, आपण पाहिलं की शेतकरी आंदोलनादरम्यान, सीएए आंदोलनात सगळ्यात ज्या बाहेरच्या शक्तींचा समावेश होता. त्यावेळी काँग्रेस त्या सर्वांसोबत उभी होती. त्यामुळं राहुल गांधी आणि काँग्रेस हे विदेशी लोकांच्या सहाय्यानं राजकारण करु इच्छितात का? ज्यावेळी राहुल गांधी भारतविरोधी विधानं करतात त्याचवेळी जॅक डॉर्सी भारताविरोधात तथ्यहिन भाष्य करतात. त्यामुळं हा प्रश्न खरंतर काँग्रेवर उपस्थित होतो, असा आरोपही यावेळी अमित मालवीय यांनी केला.

Jack Dorsey_Rahul Gandhi
Video: दिल्ली NCRमध्ये भूकंपाचे झटके! शेजारील चार राज्येही हादरली: Earthquake

अमेरिकेनं डॉर्सींना चार वेळा समन्स पाठवलं

डॉर्सी हे स्वतःला प्रत्येक देशांच्या कायद्याच्यावर समजत होते. भारतात जर कोणती कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते तेव्हा कोणतंही सरकार कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ती अकाऊंट्स बंद करण्याच्या सूचना देऊ शकते. याचा अर्थ असा होत नाही की त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात होत आहे. ही देशाच्या कायद्यानुसार केलेली कारवाई आहे. डॉर्सी यांनी हाच आरोप अमेरिकेवरही केला. अमेरिकेनं चार वेळा डॉर्सी यांना हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं होतं. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांनी एकाच पक्षाला पाठिंबा देण्याचं धोरण अबलंबलं होतं. तसेच दुसऱ्या पक्षाविरोधात मोहिम राबवली.

डॉर्सींच्या आरोपांत तथ्य नाही कारण...

डॉर्सी ज्यावेळी ट्विटरचं नेतृत्व करत होते तेव्हा ते देशांच्या सौर्वभोमत्वाला खाली खेचण्याचं काम करत होते. सातत्यानं या देशांच्या राजकारणात हस्तक्षेप करत होते. डॉर्सी जेव्हा स्वतः भारतात आले होते तेव्हा त्यांनी राजकीय भाष्य देखील केलं होतं. स्वाभाविकपणे हे कुठल्याही सार्वभौमवर राष्ट्राला स्विकारार्ह असणार नाही. त्यांनी जे आरोप केले आहेत त्यानुसार, ट्विटरला भारतात बंद केलेलं नाही, किंवा त्यांच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला अटक केलेली नाही किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यालयावर छापा टाकण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.