Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ पुरीत दोन दिवस असणार रथयात्रा! यंदाही ५३ वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ योग

Jagannath Rath Yatra 2024 : रथयात्रेमनिमीत्त ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी राज्यात या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
Jagannath Rath Yatra 2024 Odisha Majhi Govt Grants Two-Day Holiday for Annual Chariot Festival  marathi news
Jagannath Rath Yatra 2024 Odisha Majhi Govt Grants Two-Day Holiday for Annual Chariot Festival marathi news
Updated on

भुवनेश्‍वर : पुरीत जगन्नाथाची वार्षिक रथयात्रा येत्या ७ व ८ रोजी होणार आहे. यानिमित्त ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी राज्यात या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

पुरी येथील भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भावंडांच्या वार्षिक रथयात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माझी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन मंगळवारी (ता.२) करण्यात आले होते. बैठकीत त्यांनी १९७१ मध्ये शेवटचा साजरा करण्यात आलेल्या या दुर्मिळ उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. या वेळच्या उत्सवाप्रमाणे यंदाही दोन दिवस रथयात्रेचा उत्सव होणार आहे. ५३ वर्षांपूर्वी जसे विधी झाले होते, त्यावेळी तसेच विधी यंदा होणार आहेत. यावर्षी नबाजौबाना दर्शन, नेत्र उत्सव आणि रथयात्रा असे धार्मिक कार्यक्रम रविवारी (ता.७) रोजी एकाच दिवशी आले आहेत. त्यादिवशी थोड्या अंतरापर्यंत रथ ओढले जातील. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता.८) पुन्हा रथयात्रा निघेल. दोन दिवसांच्या रथयात्रेची दुर्मिळ घटना याआधी १९७१ आणि १९०९ मध्ये पाहायला मिळाली होती.

Jagannath Rath Yatra 2024 Odisha Majhi Govt Grants Two-Day Holiday for Annual Chariot Festival  marathi news
Hathras Stampede: हाथरस प्रकरणी FIR दाखल, पण 'भोले बाबा'चं नावच नाही; एआयआरमध्ये नेमकं काय?

माझी म्हणाले की, ५३ वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ रथयात्रेचा योग यंदाही आला आहे. सलग दोन दिवसांच्या हा उत्सव नवीन सरकारसाठी शुभसंकेत आहे. त्यामुळे रथयात्रेची सुट्टी आणखी एक दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अनेक परीक्षा आणि इतर गोष्टी असल्याने सुट्टी जाहीर करण्याची गरज होती. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह आहे. - पृथ्वीराज हरिचंदन, कायदा मंत्री, ओडिशा

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर यंदाच्या रथयात्रेसाठी ७ जुलैला पुरीला जाण्यासाठी तब्बल ३१५ विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. गेल्या वर्षापेक्षा गाड्यांची संख्या दुप्पट करणार आहे. स्थानकाजवळ एक मोठा तंबू उभारण्यात येणार असून त्यात १५ हजार प्रवाशांच्या बसण्याची सोय करण्यात येणार आहे. - अश्‍विनी वैष्णव, रेल्वेमंत्री

Jagannath Rath Yatra 2024 Odisha Majhi Govt Grants Two-Day Holiday for Annual Chariot Festival  marathi news
Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेतील बाबाच्या खोलीत फक्त मुलींनाच प्रवेश दिला जायचा? नारायण साकारबद्दल अनेक धक्कादायक खुलासे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.