Jagannath Temple : जगन्नाथ मंदिराची चारही द्वारे अखेर खुली

जगन्नाथ मंदिराची चारही प्रवेशद्वारे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज सकाळी भाविकांसाठी उघडण्यात आली.
Jagannath Temple
Jagannath Templesakal
Updated on

भुवनेश्‍वर - जगन्नाथ मंदिराची चारही प्रवेशद्वारे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज सकाळी भाविकांसाठी उघडण्यात आली. यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि मंत्रिमंडळ उपस्थित होते. ओडिशात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सर्व प्रवेशद्वारे उघडण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळापासून तीन प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली होती.

कोरोनाचे संकट ओसरल्यानंतरही मंदिराची तीन प्रवेशद्वारे बंदच होती. त्यामुळे एकाच प्रवेशद्वारातून मंदिरात जाताना चेंगराचेंगरी होत असे. मात्र ओडिशाच्या नव्या सरकारने प्रवेशद्वारे खुली करण्याचा निर्णय घेऊन भाविकांना दिलासा दिला. आज सकाळी ६.३० वाजता मंगल आरती झाल्यानंतर चारही प्रवेशद्वारे उघडण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री, भाजपचे खासदार, पक्षाच्या नेत्यांनी मंदिराला भेट दिली आणि भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले.

भाविकांच्या संख्येवर सरकार बारकाईने नजर ठेऊन असून एकाचवेळी गर्दी उसळणार नाही, याची खबरदार घेतली जात आहे. तसेच मंदिर परिसरात विकासकामे राबविण्यासाठी ५०० कोटींचा सुरक्षा निधी उभारण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे. यासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री माझी यांनी सांगितले. मंदिराचे दरवाजे खुले करण्याची हमी भाजपने जाहीरनाम्यात दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.