मोठी बातमी! जैन मुनींची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत, तपासासाठी 500 पोलिस तैनात

हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Jain monk Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnataka
Jain monk Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnatakaesakal
Updated on
Summary

मठात हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेत टाकलेले अवशेष काढण्यासाठी परिसरात यंत्रासह अनेक मोठ्या यंत्रांचा वापर केला.

रायबाग, चिक्कोडी : तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दोघांनी मठातच मुनींची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून रायबाग तालुक्यातील कटकभावी येथे शेतातील कूपनलिकेत टाकले होते. पोलिसांनी (Chikkodi Police) शनिवारी तेथे खोदाई करून मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढले.

आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज (Kamkumar Nandi Maharaj) असे हत्या झालेल्या जैन मुनींचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, हिरेकुडी येथे नंदीपर्वत आश्रम आहे. या आश्रमाचे मुनी आचार्य श्री १०८ कमकुमार नंदी महाराज आहेत. दोन दिवसांपासून ते आश्रमातून अचानक गायब झाले. ते कोणाच्याही निदर्शनास आले नाहीत. त्यामुळे भाविकांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला होता.

Jain monk Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnataka
NCP Crisis : अजितदादा फक्त 'मामा', आमचे नेते जयंतरावच; मुंबईतील 'त्या' भेटीवर महापौरांचं तातडीनं स्पष्टीकरण

परिसरातील आश्रमांतही ते शोधून सापडले नसल्याने शुक्रवारी सकाळीच आश्रमाच्या ट्रस्टीकडून मुनी महाराज बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती. त्यानंतर चिक्कोडी पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. सहा जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते बेपत्ता असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पाच जुलैला रात्री १० वाजेपर्यंत जैन मुनी आश्रमातील त्यांच्या खोलीत होते.

नंदीपर्वत आश्रमात गेल्या १५ वर्षांपासून हे जैन मुनी राहतात. दोन दिवसांपासून ते आश्रमात दिसले नव्हते. त्यांनी पिंची, कमंडलू आणि मोबाईल तेथेच सोडला होता. जैन मुनी जिथे जायचे तिथे पिंची आणि कमंडलू सोबत घेऊन जात होते, असे असताना या सर्व वस्तू खोलीत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यानुसार पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तपास गतीने सुरू केला.

Jain monk Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnataka
NCP Crisis : आम्ही पवार साहेबांसोबतच राहणार; निष्ठावंत आमदारानं विधानभवनात अजितदादांना स्पष्टच सांगितलं

पोलिसांनी तपासात दोन दिवसांत आश्रमात कोण-कोण आले होते, याची माहिती घेऊन संशयावरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पैशांच्या देवघेवीवरून जैन मुनींची हत्या केल्याची तोंडी कबुली दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले. जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव पाटील व उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालकही तातडीने चिक्कोडीत आले.

त्यानंतर संशयितांना घेऊन मृतदेह शोधण्याचे काम शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सुरू केले. कूपनलिकेत मृतदेह तुकडे करून टाकल्याचे संशयितांनी सांगितले. पोलिसांनी विविध मशिन, यंत्राच्या साहाय्याने कूपनलिकेच्या आजूबाजूला खोदाई करून आतमध्ये मृतदेहाचे शोधकाम सुरू केले. मुसळधार पावसातही हे शोधकाम काम सुरू होते. दिवसभरात ही माहिती जिल्ह्यात पसरताच कर्नाटक व महाराष्ट्रातील मुनींचे भक्तांनीही हिरेकोडीतील मठाकडे व रायबाग तालुक्यातील कटकभावीकडे धाव घेतली.

Jain monk Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnataka
NCP Crisis : बालेकिल्ल्यातच शरद पवारांना मोठा धक्का; साहेबांसोबत गाडीतून प्रवास करणारे मकरंद आबा दादांच्या गोटात!

पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली शोधकार्य सुरू होते. त्या परिसरात कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. माध्यमांनाही येथे निर्बंध केले होते. परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. मुनींची हत्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये म्हणून रात्रीपासूनच पोलिसांची जादा कुमक मागविली होती. कटकभावीत सुरू असलेल्या शोधकार्याच्या ठिकाणी व हिरेकोडी आश्रमाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविला होता.

रायबाग तालुक्यातील शोधकार्याजवळ पोलिस अधीक्षक संजीव पाटील, चिक्कोडीचे पोलिस उपअधीक्षक बसवराज यलीगार, अथणीचे उपअधीक्षक श्रीपाद जलदे, चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, रायबागचे मंडल पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला, हारुगेरीचे मंडल पोलिस निरीक्षक रवीचंद्रन एस., बेळगावचे उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्यासह इतर पोलिस अधिकारी तैनात होते. कामकुमार नंदी महाराज हे मूळचे अथणी तालुक्यातील खवटकोप्प येथील आहेत. त्यांनी जैन मुनीदीक्षा घेऊन २५ वर्षांपासून बाहेर असल्याचे सांगण्यात आले.

Jain monk Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnataka
Jain monk Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnatakaesakal

ओळखीच्या व्यक्तीकडून घात

मठात मुनींबरोबर चांगली ओळख असणाऱ्यांपैकी एकाने दुसऱ्याच्या मदतीने ही हत्या केल्याचे तपासात पुढे आले. मुनींकडून त्यांनी पैसे घेतले होते. ते जैनमुनींकडे परत मागितल्यानंतर त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. मठामध्येच हत्या करून तेथून मृतदेह रायबाग तालुक्यातील कटकभावीला नेऊन तेथील एका कूपनलिकेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. यातील एक संशयित कटकभावी येथील असल्याने तेथे मृतदेह नेऊन तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

Jain monk Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnataka
Congress मध्ये 45 आमदारांचा गट, त्यातील 31 आमदार फुटून बाहेर जातील याची..; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

दृष्टिक्षेपात

  • -बुधवारी रात्री १० नंतर मठातून मुनी बेपत्ता

  • -शुक्रवारी सकाळी ट्रस्टींकडून बेपत्ताची पोलिसांत तक्रार

  • -संध्याकाळी पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात

  • - संशयितांकडून हत्या केल्याची कबुली

  • -रात्री १२ नंतर मृतदेह शोधण्यासाठी कटकभावीकडे पोलिस

  • -दिवसभर कटकभावीत विविध स्वामी, भाविकांची गर्दी

  • -हिरेकोडीतील मठावरही भाविकांची गर्दी, बंदोबस्तात वाढ

  • -११ तासांनंतर मृतदेहाचे अवशेष बाहेर काढण्यात यश

  • -विविध जिल्ह्यांतील ५०० कर्मचाऱ्यांची मदत

तीस फुटांवर मिळाले अवशेष

मठात हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेत टाकलेले अवशेष काढण्यासाठी परिसरात यंत्रासह अनेक मोठ्या यंत्रांचा वापर केला. वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकून होते. ७०० फूट कूपनलिका असल्याने भोवती खोदाई केली. त्यानंतर कूपनलिकेत ३० फुटांवर हे मृतदेहाचे अवशेष सापडले.

पोलिसांनी ते उत्तरीय तपासणीसाठी तसेच फॉरेन्सिक तपासासाठी बेळगावला पाठविले. कूपनलिकेतील अवशेष काढण्यासाठी बेळगावसह, कारवार, हुबळी, धारवाड येथील ५०० कर्मचारी मोहिमेत सहभागी होते. एसडीआरएफ, एफएसएल, आरोग्य पथक, पोलिस खाते यासह विविध खात्यांची यासाठी मदत घेतली.

Jain monk Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnataka
Kolhapur : 'बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेली ही दीवार आहे, छोट्या-मोठ्या धक्क्याने ती कोसळणार नाही'

पोलिसांनी असा केला तपास

बुधवारी रात्री मुनी बेपत्ता झाले. भक्तांनी गुरुवारी शोध घेऊन शुक्रवारी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार चिक्कोडी पोलिसांनी तपास गतीने करत बुधवारी रात्रीच मठामध्ये कोण आले होते, याचा शोध घेऊन त्याच्याकडे कसोशीने चौकशी केल्यावर खुनाचे गूढ उकलले. याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दोघांनी खुनाची कबुली शुक्रवारी रात्रीच दिली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू केले. पोलिसांनी गतीने तपास केल्याने हे हत्येचे गूढ उकलले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.