Sammed Shikhar : 'सम्मेद शिखर'साठी आणखी एका जैन साधूनं दिली प्राणाची आहुती; समर्थ सागर महाराजांचं निधन

सम्मेद शिखरला वाचवण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या आणखी एका जैन साधूचा मृत्यू झाला आहे.
Muni Samarth Sagar Maharaj
Muni Samarth Sagar Maharajesakal
Updated on

झारखंडमधील जैन धर्मियांचं (Jain Community) तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी (Sammed Shikhar) तीर्थक्षेत्राला केंद्र सरकारनं पर्यटन स्थळ घोषित केल्यानं सकल जैन समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय. सम्मेद शिखरजी हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचं सांगत जैन समाजातील बांधवांकडून निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान, सम्मेद शिखरला वाचवण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या आणखी एका जैन साधूचा मृत्यू झालाय. जयपूरच्या सांगानेर येथील संघीजी जैन मंदिरात 3 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेले मुनी समर्थ सागर यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. याआधी मुनी सुज्ञेय सागर महाराज यांनी सम्मेद शिखरासाठी बलिदान दिलं होतं.

Muni Samarth Sagar Maharaj
Uttar Pradesh Crime News: रक्ताच्या नात्याला फासला कलंक! बापानं स्वतःच्याच 7 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, आईनं दाबलं चिमुरडीचं तोंड

मुनी समर्थ सागर महाराज (Muni Samarth Sagar Maharaj) यांचं गुरुवारी मध्यरात्री 1.20 वाजता निधन झालं. मुनी सुज्ञेय सागर महाराजांच्या निधनानंतर समर्थ सागर अन्नपाणी सोडून आमरण उपोषणाला बसले होते. आज शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता संघीजी जैन मंदिरातून मुनिश्रींची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये भाविकांचा मोठा सहभाग होता. सांगानेर येथील जैन समाज मंदिरात सम्मेद शिखर वाचवण्यासाठी मुनी समर्थ सागर महाराज उपोषणाला बसले होते.

Muni Samarth Sagar Maharaj
Crime News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात दिले फेकून

'केंद्र सरकारचा आदेश दिशाभूल करणारा'

ऑल इंडिया दिगंबर जैन यूथ युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक जैन बिट्टू यांनी सांगितलं की, केंद्र सरकार आणि झारखंड सरकारला जैन समाज व सम्मेद शिखराचं महत्त्व कळत नाहीये. गेल्या चार दिवसांत मुनी समर्थ सागर महाराज हे दुसरे मुनीराज आहेत, ज्यांनी सम्मेद शिखरसाठी देहत्याग केला. केंद्र सरकारनं गुरुवारी जारी केलेला आदेश केवळ जैन समाजाची दिशाभूल करण्यासाठी काढण्यात आला आहे. सत्तेच्या बळावर कोणाचा फायदा घेतला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()